आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पचौरींच्या याचिकेवर सुनावणीस नकार, परदेश दौ-याची मागितली होती परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पर्यावरणवादी नेते आर. के. पचौरी यांच्या याचिकेवर सुनावणीस सोमवारी न्यायालयाने नकार दिला. पचौरी यांनी विदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, न्यायाधीश राजकुमार त्रिपाठी यांनी त्यांना आपली याचिका मागे घेऊन महानगर दंडाधिका-यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले.

पचौरी यांनी ग्रीसमध्ये होणा-या जागतिक पाणी परिषदेत सहभागी होण्यासाठी २६ ते २९ एप्रिलदरम्यान परदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. यामध्ये ते प्रमुख वक्ते आहेत. त्यांच्या याचिकेला पीडितेच्या वकिलाने विरोध केला. प्रकरणाची सुनावणी महानगर दंडाधिका-यांकडे सुरू असल्याचे कारण त्यंानी दिले होते. त्यांना संबंधित न्यायालयच सवलत देऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते. सत्र न्यायालय पचौरी यांना कोणत्याही प्रकारची सवलत देऊ शकत नाही. हे प्रकरण आपल्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

२००७ पासून पचौरी टेरीचे सदस्य
टेरीचे(द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट) महासंचालक पचौरी २००७ मध्ये परिषद स्थापन झाल्यापासून सदस्य होते. त्यांना गेल्या वर्षी पुन्हा सदस्य करण्यात आले होते.