आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती इराणी यांना झटका, बनावट पदवीप्रकरणी कोर्टाने याचिका स्विकारली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील एका कोर्टाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अडचणी वाढ केली आहे. ते म्हणजे, स्मृती इराणी यांच्या कथित बनावट पदवी विरोधातली याचिका पटियाळा हाऊस कोर्टाने स्विकारली आहे. स्मृती इराणी यांच्याविरोधात दाखल झालेली याचिका दाखल करण्याजोगी असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 28 ऑगस्टला होणार आहे.
दुसरीकडे, कॉंग्रेसला भाजपवर टीका करर्‍याची आयती संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेत कॉंग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी बोगस पदवीप्रकरणी स्मृती इराणी यांनी आपल्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध अहमर खान यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. इराणी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप अहमर खान यांनी केला आहे.
खान यांचे वकिलांनी कोर्टात सांगितले की, स्मृती इराणी यांनी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात शैक्षणिक पात्रतेबाबत वेगवेगळी माहिती दिली आहे.


सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठाची बीएची पदवी सादर केली होती. तर 2011 च्या निवडणुकीच्या शपथपत्रात बीकॉम प्रथम वर्ष अशी शैक्षणिक पात्रता नमूद केली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत बीकॉम प्रथम वर्ष हे ओपन स्कूलमधून केल्याचे म्हटले आहे.