आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Court Frames Defamation Charge Against Kejriwal, AAP Leaders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवाल, शिसोदिया, भूषण आणि शाजियांविरोधात अब्रुनुकसानीचे आरोप निश्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीतील एका खालच्या न्यायालयाने माजी दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांचा मुलगा अमित सिब्बल यांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्यावरील सुनावणीदरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह चौघांवर आरोप निश्चित केले आहेत. मेट्रोपॉलिटिन मॅजिस्ट्रेट सुनील कुमार शर्मा यांनी केजरीवाल, माजी मंत्री मनीष शिसोदिया, आम आदमी पार्टीचे (आप) नेते प्रशांत भूषण आणि शाजिया इल्मी यांच्या विरोधात हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणी 17 जानेवारी 2015 पासून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात होणार आहे.
काय होते प्रकरण
अमित सिब्बल यांनी चौघांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. केजरीवाल यांनी 2013 मध्ये एका कार्यक्रमात कपिल सिब्बल यांच्यावर आरोप केले होते. कपिल सिब्बल दूरसंचार मंत्री असताना अमित सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात व्होडाफोनचा खटला चालवला होता, असे ते म्हणाले होते. या कार्यक्रमात शिसोदिया, भूषण आणि इल्मी यांचीही उपस्थिती होती. इल्मी यांनी सध्या पक्षाचा राजीनामा दिला आहे.