आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Green Light For Shifting Gir Lions To M.P.

जंगलाच्या राजाचे मध्य प्रदेशात ‘माहेर’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या आशियाई सिंहांच्या प्रजातींचे मध्य प्रदेश माहेरघर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने सहा महिन्यांत गुजरातच्या गीर अभयारण्यातून काही सिंह मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्यात सोडण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. जंगलात लागणारी आग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या काळात सिंहांचा बचाव करण्यासाठी दुसरी सुरक्षित जागा असणे आवश्यक असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी गुजरात सरकारचा विरोध फेटाळून लावताना नॅशनल बोर्ड फॉर वाइल्डलाईफने (एनसीडब्ल्यूएल) घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन आणि न्या. चंद्रमौळी कुमार प्रसद यांच्या पीठाने एका जनहित याचिकेवर हा आदेश दिला. आशियाई सिंहांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मंत्रालयाने लवकारात लवकर हे सिंह कुनो-पालपूर अभयारण्यात नेण्याची व्यवस्था करावी. आता उशीर व्हायला नको, असे निर्देश कोर्टाने दिले. या निकालाचा अभ्यास करून पुढील धोरण ठरवले जाईल, असे गुजरात सरकारचे प्रवक्ते नितीन पटेल यांनी म्हटले आहे.

संख्या समितीच निश्चित करेल: सिंहांची संख्या कुनो-पालपूर अभयारण्यातील अन्य प्राण्यांच्या संख्येवर अवलंबून असेल. याचा निर्णय वन तसेच पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी, गुजरात व म.प्र.चे चीफ वाइल्डलाईफ वॉर्डन आणि तांत्रिक तज्ज्ञ समिती घेईल, असे आदेशात नमूद आहे. नामिबियातून आफ्रिकी चित्ते आणण्याला परवानगी देण्यास मात्र सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

सिंहांच्या संवर्धनासाठी चांगले पाऊल
न्यायालयाचा निर्णय या प्रजातीच्या दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने एक चांगले पाऊल आहे. अशा प्रकारे एखाद्या प्रजातीतील प्राण्यांना त्यांच्या आधीच्या अधिवास क्षेत्रात हलवण्यास मानवी क्षेत्रविस्तार असे म्हणता येईल, असे बीएनएचएस इंडियाने म्हटले आहे.