आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Imposes Fine Of Rs 2,500 Each On Arvind Kejriwal, Manish Sisodia

अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांना दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांना पतियाळा हाऊस न्यायालयाने प्रत्येकी अडीच - अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाचे आदेश असूनही ते कोर्टात हजर न राहिल्याप्रकरणी त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचे पुत्र अमित यांनी आपचे नेता केजरीवाल, सिसोदिया तसेच प्रशांत भूषण व शाजिया इल्मी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यासंदर्भात त्यांना हजर राहण्यासाठी न्यायालयाने नोटीस बजावली होती. परंतु ते हजर झाले नाहीत. याप्रकरणी पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी परवानगी मागितली होती.