आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court May Sentence Rape Accused Uber Driver Today

उबेर प्रकरण : दोषी टॅक्सीचालकाला जन्मठेपेची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उबेर टॅक्सी बलात्कार प्रकरणातील दोषी ड्रायव्हर शिवकुमार यादवला मंगळवारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीतील तीसहजारी फास्ट ट्रॅक कोर्टाने 20 ऑक्टोबर रोजी शिवकुमारला दोषी ठरवल होते. गेल्या वर्षी 5 डिसेंबरच्या रात्री उबेर टॅक्सीमध्ये एका महिला प्रवाशावर बलात्कार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता.
या कलमांनी दोषी ठरला शिवकुमार
आरोपी ड्रायव्हर शिवकुमार यादवला आयपीसी कलम 376 (2) (बलात्कारादरम्यान इजा पोहोचवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न), 366 (शारीरिक संबंधाच्या इराद्याने अपहरण), 506 (मारण्याची धमकी) आणि 323 (शारीरिक आणि मानसिक आघात करणे) या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते.
काय म्हटले निकालपत्रात
तीसहजारी फास्ट ट्रॅक कोर्टाने 99 पानांच्या निकालपत्रात म्हटले, की आरोपी ड्रायव्हरने पीडित महिलेच्या शरीरात लोखंडी सळई टाकण्याची धमकी दिली आणि तिला 16 डिसेंबर 2012 च्या चालत्या बसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची आठवण करुन दिली.

काय आहे प्रकरण
गेल्या वर्षी 5 डिसेंबरच्या रात्री गुडगाव येथे नोकरी करत असलेल्या एक तरुणीने वसंतविहार येथून उत्तर दिल्लीतील इंद्रलोक येथील आपल्या घरी जाण्यासाठी उबेर टॅक्सी अॅपच्या मदतीने टॅक्सी बुक केली होती. त्याच रात्री टॅक्सी ड्रायव्हर शिवकुमारने तरुणीचे अपहरण करुन टॅक्सीतच तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेनंतर तो फरार झाला होता. घटनेच्या दोन दिवसानंतर उत्तर प्रदेशातील मथुरेतून त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्याला ऑक्टोबरमध्ये दोषी ठरविण्यात आले आणि सध्या तो न्यायालयिन कोठडीत आहे.