आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीरभद्र यांना कोर्टाने फटकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना नोटीस जारी करण्यात येणार आहे. त्यानंतरच ते कोर्टासमोर बाजू मांडू शकतील.

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी वीरभद्र सिंह यांच्या वकिलाला अशी स्पष्ट ताकीद दिली आहे. वीरभद्र सिंह यांच्या वकिलाने मुख्यमंत्र्यांना नोटीस न पाठवता स्वत:ची बाजू मांडण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ही मागणी धुडकावली आहे. एनजीओ ‘कॉमन कॉज’ने वीरभद्र यांच्याविरुद्ध जनहित यािचका दाखल केली होती. मुख्यमंत्रिपदी असताना व केंद्रात मंत्रिपदी असताना भ्रष्टाचार, अपहार, फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. न्यायालयात चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.