आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाने व्ही. के. सिंह यांच्याकडून मागवले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हरियाणात दोन दलित मुलांना जाळल्याच्या घटनेबद्दल दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिल्लीच्या न्यायालयाने केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्याकडून उत्तर मागवले आहे. तुमच्याविरोधात खटला दाखल का करू नये, अशी विचारणा न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केली.
 
उत्तर देण्यासाठी सिंह यांना ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालयाने अर्ज खारिज केल्यानंतर अॅड. सत्यप्रकाश गौतम यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.एखाद्याने कुत्र्याला दगड मारला तर त्यासाठी सरकारला दोषी ठरवले जाऊ शकत नाही, असे वक्तव्य परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आणि निवृत्त लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी हरियाणातील घटनेनंतर केले होते. अॅड. गौतम यांनी त्यावर फेरविचार याचिका दाखल केली होती.
 
बातम्या आणखी आहेत...