आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Orders Immediate Release Of Manipuri Activist Irom Sharmila

'आयर्न लेडी' इरोम शर्मिला यांना त्वरित मुक्त करण्याचे कोर्टाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः इरोम शर्मिला)
इंफाळ - येथील स्थानिक न्यायालयाने मानवी हक्कांसाठी लढणा-या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांना त्वरित मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने त्यांच्यावर लावण्यात आलेले आत्महत्येचे सर्व आरोपही मागे घेतले आहेत. स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर हे आरोप लावले होते.

इरोम शर्मिला या सैन्याला देण्यात आलेला एएफएसपीए हा विशेषाधिकार (AFSPA) रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 14 वर्षांपासून (4 नोव्हेंबर 2000 पासून) अनिश्चित काळासाठी उपोषण करत आहेत. त्यांना वारंवार तुरुंगातून रुग्णालयात आणले जाते. त्यावेळी त्यांच्या नाकात लावण्यात आलेली नळी दिसत असते. 'आयर्न लेडी' नावाने प्रसिद्ध असलेल्या इरोम (42) यांना सध्या इंफाळच्या जवाहरलाल नेहरू संस्थेमध्ये नजरकैदैत ठेवण्यात आले आहे. आत्महत्या करू नये म्हणून त्यांना नजरकैदैत ठेवण्यात आले आहे. या ठिकाणालाच उपतुरुंग असेही घोषित केले आहे.

14 लोकांच्या हत्येमुळे सुरू झाले उपोषण
इंफाळमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी 14 निर्दोष नागरिकांना गोळ्या घातल्या होत्या, त्यावेळी इरोम यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्यावेळी या घटनेची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. या घटनेतील मृतांमध्ये एका 62 वर्षांच्या वृद्धेचा आणि एका 18 वर्षीय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त युवकाचाही समावेश होता. त्याच्या विरोधात इरोमने AFSPA रद्द करण्याची मागणी करत उपोषण सुरू केले होते. तीन दिवसांनंतरच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी त्या केवळ 27 वर्षांच्या होत्या.

एएफएसपीए म्हणजे काय?
सशस्त्र दल (विशेष अधिकार) अधिनियम, 1958 (एएफएसपीए) च्या अंतर्गत सुरक्षादलांना एखाद्याला पाहताक्षणीच गोळी मारण्याचा, वॉरंटशिवाय किंवा चौकशीशिवाय अटक करण्याचा असे अनेक अधिकार प्रदान केले जातात. या कायद्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांची कोणत्याही कारवाईतून सुटका होते.