आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मुख्यमंत्री चौटाला न्यायालयीन कोठडीत, जामीनदाराने हमी मागे घेतली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आपल्या ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात एका जामीनदाराने जामीन मागे घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
सुरजित सिंग यांनी चौटाला यांचा जामीन घेतला होता. पण वैयक्तिक कारणांमुळे आता आपल्याला जामीन राहता येणार नाही, असा अर्ज त्यांनी दिला होता. सीबीआयचे विशेष न्यायाधीश संजय गर्ग यांनी सिंग यांना जामीन मागे घेण्यास परवानगी दिली. सुनावणीच्या वेळी चौटाला न्यायालयात हजर होते. त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. न्यायालय सध्या या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेले चौटाला सध्या तुरुंगातच आहेत. हरियाणात वर्ष २००० मध्ये ३ हजार २०६ शिक्षकांच्या भरतीत त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. न्यायालयाने त्यांना १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
सीबीआयने बेकायदा संपत्ती प्रकरणात ओमप्रकाश चौटाला आणि त्यांची दोन मुले अजय आणि अभय यांच्याविरोधात तीन खटले दाखल केले आहेत. हरियाणा काँग्रेसचे नेते समशेरसिंग सुरजेवाला यांनी याबाबत तक्रार दिली होती. सीबीआयने २६ मार्च २०१० रोजी चौटाला यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यांनी ६.०९ कोटी रुपयांची अवैध संपत्ती बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात अभय चौटाला आणि अजय चौटाला यांच्याविरोधातही खटला सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...