आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Permitted To Brought Papers Related To National Herold Case

हेरॉल्ड प्रकरण : दस्तऐवज मागवण्यास कोर्टाची परवानगी, स्वामी यांची विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अर्थ, नागरी विकास, उद्योग-व्यवहार, कर विभागाकडून यासंबंधीची कागदपत्रे मागवण्यास परवानगी दिली आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेद्वारे दस्तऐवजांची मागणी केली होती.

दिल्ली महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वामी यांना प्रक्रिया शुल्क भरण्यास सांगितले. जेणेकरून समन्स पाठवले जाऊ शकतील. दिल्ली विकास प्राधिकरण आणि कंपनी रजिस्ट्रारसारख्या विभागांकडूनही स्वामी यांनी कागदपत्रे मागवली आहेत. विविध मंत्रालये आणि संस्थांकडे काही कागदपत्रे आहेत. त्यांच्याकडे कशा प्रकारची कागदपत्रे आहेत, याची माहिती मला नाही; परंतु ती मागवण्यात यायला हवीत, असे स्वामी यांनी म्हटले आहे. दरम्यान, १९ डिसेंबर २०१५ रोजी न्यायालयाने काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे यांना जामीन मंजूर केला होता. त्या दिवशी सॅम पित्रोदा यांना समक्ष हजर न राहण्याची परवानगी दिली होती. पित्रोदा यांनी आजारपणाचे कारण सांगितले होते. कोर्टाने ते मान्य केले होते.

काय आहे प्रकरण?
बंद पडलेल्या नॅशनल हेराॅल्ड वृत्तपत्राच्या इमारतीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात असल्याचा ठपका आहे. त्याशिवाय फसवणूक, कट,विश्वासघाताचेही आरोप आहेत. यांनी केला आहे. वृत्तपत्राची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप आहे.