आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Demand About Smriti Irani's Educational Proof

कोर्टाने मागितले स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेचे पुरावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील एका न्यायालयाने निवडणूक आयोग आणि दिल्ली विद्यापीठाला (डीयू) नोटीस बजावत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्मृती यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीवर सुनावणी करतेवेळी हे आदेश बजावण्यात आले आहेत. तक्रारकर्ते आकाश जैन यांनी केलेल्या आरोपात म्हटले होते की इराणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती दिलेली आहे.

जाणिवपूर्वक खोटी माहिती देणाऱ्या उमेदवाराला लोकप्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंडसंहितेनुसार शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ मार्च रोजी होणार आहे.