आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घोटाळा : मनमोहन यांची चौकशी का नाही? कोर्टाची सीबीआयला विचारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : मनमोहन सिंग

नवी दिल्ली - कोळसा घोटाळा प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांची चौकशी का करण्यात आली नाही, अशी विचारणा एका विशेष न्यायालयाने सीबीआयकडे केली आहे. कोळसा खाणींच्या वाटपाच्या वेळी कोळसा मंत्रालय मनमोहन सिंग यांच्याच अख्त्यारित होते.

या प्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती के.एम. बिर्ला, माजी कोळसा सचिव पी.सी.पारेख यांच्यासह अनेकांची नावे समोर आली होती. बिर्ला कंपनीने हिंडालकोला ओडिशाच्या तालाबीरामध्ये 2005 मध्ये कोळसा खाणी वाटप केल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग कोळसा मंत्रालयाचेही काम पाहत होते.

परवानगीही नाही अन् गरजही नव्हती-सीबीआयचे उत्तर
विशेष सीबीआई न्यायाधीश भरत पाराशर यांनी जेव्हा विचारले की, तुम्हाला या प्रकरणी तत्कालीन कोळसा मंत्र्यांची चौकशी करण्याची गरज भासली नाही का? या प्रकरणी त्यांचा जबाब महत्त्वाचा ठरला नसता का? अशी विचारणा केली. त्याच्या उत्तरात सीबीआयच्या तपास अधिका-यांनी म्हटले की, या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाच्या अधिका-यांची चौकशी करण्यात आली व त्यात तत्कालीन कोळसा मंत्र्यांची चौकशी केली नव्हती. पंतप्रधानांच्या चौकशीची गरज नव्हती आणि त्यांच्या चौकशीसाठी परवानगीही मिळाली नाही, असे ते म्हणाले.
कोर्टाने मागवली केस डायरी
सुनावणीदरम्यान कोर्टाने सीबीआईला केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले. त्यावर सरकारी पक्षाचे वकील व्ही.के.शर्मा यांनी सीलबंद लिफाफ्यांमध्ये दस्तावेज सादर करण्याची परवानगी मागितली. त्यानंतर 27 नोव्हेंबरच्या सुनावणीपर्यंत प्रकरण पुढे ढकलण्यात आले. 10 नोव्हेंबरला सीबीआयने न्यायालयाला काही खासगी कंपन्या आणि नोकरशहांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे म्हटले आहे.