आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंना हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्लीतील एका न्यायालयाने व्यक्तिश: हजर न राहण्याची मुभा फेटाळून लावत 26 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 2008 मध्ये बिहारींचा तिरस्कार करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणात हे आदेश देण्यात आले आहेत.


वाय दर्जाची सुरक्षा मिळाली नसल्याने आपण न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचा राज यांचा युक्तिवाद होता. त्यावर सवलतीसाठी हा आधार ठरू शकत नाही. ज्या व्यक्तीला सुरक्षा मिळाली आहे ती तर न्यायालयात हजर राहू शकते. तसेही राज यांच्या विरोधात 3 जानेवारी 2009 रोजी जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे, असे अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी देवेंद्रकुमार शर्मा यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश शर्मा यांनी दिले आहेत. बिहार स्टेट बार कौन्सिलचे सदस्य प्रेमचंद जायसवाल यांच्या याचिकेवरून न्यायालयाने हा आदेश दिला आहे.