आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DDCA : \'आप\' नेत्‍यांनी माझ्या विरोधात खोटे वक्‍तव्‍य केले - अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्‍यायालयात जाताना जेटली. - Divya Marathi
न्‍यायालयात जाताना जेटली.
नवी दिल्‍ली - दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्‍या पाच नेत्‍यांनी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्‍यावर दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) घोटाळ्याचे आरोप केले. त्‍यामुळे जेटली यांनी त्‍यांच्‍यावर अब्रुनुकसानीचा दावा केला. या प्रकरणी पटियाला न्‍यायालयात सुनावनी सुरू असून, जेटली यांनी मंगळवारी न्‍यायालयात म्‍हटले की, केजरीवाल आणि इतर पाच लोकांनी माझ्या विरोधात खोटे वक्‍तव्‍य केले. दरम्‍यान, न्‍यायालयाने त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेत पुढील सुनावणीसाठी 3 फेब्रुवारी ही तारीख दिली.
सोशल मीडियातून मला बदनाम केले.._
जेटली म्‍हणाले, “आप नेत्‍यांनी ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून मला बदनाम केले आहे. राघव चड्ढा यांनी केजरीवाल यांच्‍या ट्वीट्सला रिट्वीट केले. त्‍यामुळे माझी बदनामी झाली. ”
10 कोटी रुपयांचा दावा ...
केजरीवाल आणि इतर नेत्‍यांना जेटली यांनी दहा कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली असून, हा दावा वैयक्तिक स्वरूपाचा आहे. या बाबत जेटली यांनी मंगळावारी न्‍यालयात पुरावे सादर केले.
जेटलींनी का दाखल केली याचिका ?
- 'आप'च्‍या नेत्‍यांनी 17 डिसेंबरला म्‍हटले होते की, जेटली हे डीडीसीएचे अध्‍यक्ष असताना 21 कोटींच्‍या कामाचा 114 कोटी रुपये खर्च दाखवण्‍यात आला. यातील 90 कोटी रुपये कुठे गेले ?
- आप नेत्‍यांनी जेटली यांना मोदींच्‍या मंत्रीमंडळातील सर्वात भ्रष्‍टाचारी मंत्री म्‍हटले.
- या नंतर जेटलींनी अब्रुनुकसानीचा दावा केला.
- जेटली यांच्‍यासोबत भाजपचे अनेक मोठे नेते कोर्टात पोहोचले होते.
बातम्या आणखी आहेत...