आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Told Nityananda Why Are Terrified Of Potency Tests

पाँटेसी टेस्टला का घाबरता? सुप्रीम कोर्टाची नित्यानंद स्वामीला विचारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी असलेल्या नित्यानंद स्वामीला सुप्रीम कोर्टाने, पाँटेसी टेस्ट करण्यास का घाबराता? अशी विचारणा केली आहे. तसेच या प्रकरणाला विलंब होत असल्याबाबात पोलिसांनाही न्यायालयाने विचारणा केली आहे.

स्वामी नित्यानंदवर 2010 मध्ये रामनगरम येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरील सुनावणीदरम्यान कर्नाटक हायकोर्टाने नित्यानंदची पँटेसी टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या विरोधात नित्यानंदने सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या तपासणीसाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे नित्यानंद यांनी याचिकेत नमूद केले होते. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टीस रंजना प्रकाश देसाई यांच्या पीठाने यासंदर्भात सुनावणी केली.
लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांचा विचार करता, ही चाचणी करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने सांगितले. चाचणी केली जाऊ शकत नाही, असे तुम्ही कसे सांगू शकता अशी विचारणा न्यायालयाने त्यांच्याकडे केली. चाचणीला नकार देण्याचे काहीही कारण नाही. तसेच तुम्ही जर या चाचणीला विरोध करणार असाल, तर त्याचे वेगळे अर्थ घेतले जाऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.