आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ लव्ह जिहादप्रकरणी कोर्टाने घेतली कठोर भूमिका; गूढ कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केरळमधील लव्ह जिहादप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना, तपासासंबंधी दस्तऐवज राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश एनआयएच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर जारी केले. सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्या. डी.वाय.चंद्रचुड यांच्या पीठाने याचिकाकर्त्या शफीन जहान यांना एनआयएकडे तपासाचा तपशील देण्यास विरोध केल्यानंतर फटकारले. आम्ही याप्रकरणी डोळेझाक करणार नाही. जिहादच्या ट्रेंडने आम्ही प्रभावीत नसून केवळ राष्ट्रीय सुरक्षेला यापासून धोका आहे का, याची पडताळणी न्यायालय करेल.  पुढची सुनावणी १६ ऑगस्ट रोजी होईल. केरळ उच्च न्यायालयाने हदियाचा शफीन जहाँद्वारे लावण्यात आलेल्या निकाहाला रद्द ठरवले होते. धर्म परिवर्तन करीन हा निकाह झाला होता. एनआयएचा यात हस्तक्षेप नसावा, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी केरळ पोलिस तपास करत आहेत. हा तपास पूर्ण झाला नसल्याने एनआयएचा हस्तक्षेप नसावा, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. 

प्रकरण सामान्य नाही
न्या. खेहर आणि न्या. चंद्रचूड यांनी म्हटले की, हे एकमेव प्रकरण आहे की याचे इतर धागेदोरे आहेत, हे तपासले पाहिजे. हे सामान्य प्रकरण नसल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले. मुलीचे नाव तीन वेळा बदलण्यात आले. उच्च न्यायालयाने मुलीशी संवाद साधला. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तिचा निकाह ज्याच्याशी झाला त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, हे तपासले जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...