आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Upheld The Sentence Of Raju In Satyam Fraud Case

सत्यम गैरव्यवहार प्रकरणात संस्थापक राजूची शिक्षा कायम, कोर्टाने याचिका फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सत्यम गैरव्यवहार प्रकरणी हैद्राबाद येथील सत्र न्यायालयाने ‘सत्यम कॉम्प्युटर्स‘चा संस्थापक बी. रामलिंग राजू याला कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत त्याची याचिका फेटाळून लावली.

करचोरी करताना सरकारची फसवणूक केल्याचा राजू याच्यासह इतर ९ जणांवर आरोप आहे. स्थानिक न्यायालयाने या सर्वांना ५ कोटी रुपये दंड व सात वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेस राजूने सत्र न्यायालयाने आव्हान दिले होते. या सोमवारी झालेल्या सुनावणीत ही शिक्षा कायम ठेवण्यात आली.

स्थानिक न्यायालयाने दिलेला निकाल कायदेशीररीत्या योग्य नसल्याचे सांगत या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतली नाही, असा बचाव पक्षाचे वकील व्ही. सुरेंद्र राव यांनी सत्र न्यायालयात केला. मात्र, हा बचाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. कार्पाेरेट घोटाळ्यात आरोपींना शिक्षा झालेला देशातील हा पहिलाच खटला आहे. न्यायालयाने राजूला फसवणूक, विश्वासघात, खोटी कागदपत्रे बनविणे अशा गुन्ह्यांखाली दोषी ठरवले आहे. यापूर्वी दोनदा खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सुमारे सहा वर्ष चाललेल्या प्रकरणात ३ हजार कागदपत्रे आणि २२६ साक्षी नोंदवण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली कागदपत्रे अभ्यासून साक्षी नोंदवण्यात बराच कालावधी गेला.