आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : स्पाइसजेटच्या विमानात कॅबिन क्रू थिरकल्या, दोन पायलट निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून विमानात साजरी झालेली होळी स्पाइसजेटला महागात पडणार आहे. डीजीसीएच्या नोटीसीनंतर स्पाइसजेटने त्यांच्या दोन पायलटला निलंबित केले आहे. स्पाइसजेट एअरलाइन्सच्या प्लाइटमध्ये होळीच्या दिवशी डान्स करण्यात आला होता. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीजीसीएकडून स्पाइसजेटला तुमचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
होळीच्या दिवशी स्पाइसजेटच्या विमानांमध्ये रंगारंग कार्यक्रम साजरे करण्यात आले होते. यात कॅबिन क्रू विमानाच्या उड्डानादरम्यान हिंदी चित्रपट संगीतावर थिरकले होते. यात महिला कर्मचारी देखील मागे नव्हत्या. हा डान्स कार्यक्रम अनेकांनी मोबाईलमध्ये शुट केला आणि युट्यूबवर लोड केला. त्यासोबत इतरही सोशल नेटवर्किंग साइटवर हा व्हिडिओ पसरला आहे. डीजीसीएने हा व्हिडिओच पुरावा म्हणून ग्राह्य धरत स्पाइसजेटला नोटीस बाजवली आहे. त्यात म्हटले आहे, की कॅबिन क्रूच्या या कृत्यामुळे विमानातील इतर सदस्यांवर त्याचा वाइट परिणाम झाला असता आणि प्रवासीही थिरकले असते तर, अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता.
स्पाइसजेटच्या गोवा-बंगळुरु या विमानाशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन दिल्ली-गोवा-दिल्ली, जयपूर-मुंबई-दिल्ली, मुंबई-बंगळुरु-कोलकाता आणि बंगळुरु-पुणे-अहमदाबाद या विमानांमध्येही करण्यात आले होते.

व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...