आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Diplomacy: Modi Take U Turne, Within 5 Months Telephoned Sharif

क्रिकेट डिप्लोमसी: नरेंद्र मोदींचा यू टर्न, ५ महिन्यांत नवाझ शरीफ यांना केला फोन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गतवर्षी २६ नोव्हेंबरला सार्क परिषदेत मोदी - शरीफ अशा पवित्र्यात दिसले.
नवी दिल्ली/इस्लामाबाद - गेल्या काही दिवसांत भारत-पाकच्या संबंधात आलेली कटुता दूर करण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान निमित्त शोधत होते... आणि अखेर ते मिळालेही. रविवारी भारत-पाक क्रिकेट सामना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यू टर्न घेत का होईना पण या संधीचा लाभ घेतलाच. शुक्रवारी सकाळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी १९८७ च्या वर्ल्डकपमधील सराव सामन्याची आठवण करून दिली. विंडीज - पाक सामन्यादरम्यान कर्णधार इम्रान खानला ‘नवाझ शरीफ यांना खेळायचे आहे’ असा संदेश मिळाला. इम्रान राजी झाला आणि त्यानंतर शरीफ मैदानात उतरले. तेव्हा शरीफ पाकव्याप्त पंजाबचे मुख्यमंत्री होते.
मोदींनी याची आठवण करून देताच शरीफ यांनी ‘ते दिवस पुन्हा आले असते तर’ असे म्हणत त्यांना दाद दिली. दरम्यान, मोदींनी परराष्ट्र सचिव जयशंकर यांना इस्लामाबाद पाठवण्याचा मुद्दा पुढे केला. लागलीच मोदींनी वर्ल्डकपमध्ये खेळणा-या अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेशच्या राष्ट्रप्रमुखांनाही फोन करून शुभेच्छा दिल्या. क्रिकेट लोकांना जोडते आणि सद्भावना वाढीस लावते, अशा शब्दांत ट्विटरवरून आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
पुढे वाचा, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चर्चा टळली होती