आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश रैनाच्या विवाहाचे नातेवाइकांना नव्हते निमंत्रण, मामाचे डोळे पाणावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मामासोबत सुरेश रैना)
शिमला- ज्या मामाच्या अंगाखांद्यावर खेळून मोठा झालेला क्रिकेटर सुरेश रैनाला लग्नात त्याच मामाचा विसर पडला. एवढेच नव्हे तर रैनाने आपल्या विवाहात बहुतेक नातेवाईकांना निमंत्रित केले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
आपला भाचा सुरेश रैनाचा शाही विवाह सोहळा टीव्हीवर पाहून मामा मांगो राम हे अश्रु पुसत होते. रैनाने आपल्याला विवाहाला बोलावले नाही, याचे दु:ख आता आयुष्यभर सतावेल. परंतु, रैनाने खूप मोठा क्रिकेटर व्हावे, असाही आर्शिवाद हिमाचल प्रदेशामधील मटोर येथील रहिवासी मांगो राम यांनी दिला.
टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैना शुक्रवारी (3 एप्रिल) प्रियंकासोबत विवाहबद्ध झाला. रैनाच्या मामांना त्याच्या आई-वडिलांनी निमंत्रित केले नाही. रैनाच्या साखरपुड्याचे वृत्तही मामांना टीव्हीवरून समजले.
मामा मांगों राम यांनी सांगितले की, रैनाच्या आई-वडीलांचा फोन आला होता. रैनाच्या विवाहाला कोणत्याही नातेवाइकाला बोलवण्यात आलेले नाही. परंतु, रिसेप्शनला सर्व नातेवाइकांना बोलवणार आहे.रैनाच्या विवाहाला राजकीय, बॉलीवूड, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक नामी व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे नातेवाइकांना नंतर बोलावण्याचे ठरले असल्याचे रैनाच्या आई-वडीलांनी सांगितले होते. विवाह झाला, रिसेप्शनही झाले मात्र निमंत्रण आले नसल्याचे मांगो राम यांनी सांगितले.

भाच्याच्या विवाहात मामा आवश्यकच...
रैनाच्या अन्य दोन मामांनाही निमंत्रित करण्‍यात आले नव्हते. तसे पाहिले तर हिंदूधर्मात मामाविना विवाह संपन्न होत नाही. विवाहात नवरदेवाचा मामा भात आणतो. तसेच विवाहाच्या अशा अनेक विधी आहेत की, त्या नवरदेवाच्या मामाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. लग्नात पाणी भरण्याचा विधी महत्त्वपूर्ण मानला जातो आणि हा विधी मामा करत असतो. यानंतर शांती हवन, वरातीतही मामाच नवरदेवाला पुढे घेऊन जातो.

धर्मशाळा येथे मामाच्या घरी अवश्य जातो रैना...
सुरेश रैना हा धर्मशाळा येथे क्रिकेट खेळायला गेल्यानंतर मामाकडे अवश्य जातो. मामाकडेच जेवण करतो. रैनाचे मामा हिमाचलमधील डमटालच्या मोहटली सूरजपूर उपला येथील रहिवासी आहेत. मांगो राम यांची बहिणीचा (सुरेश रैनाची आई) विवाह पठानकोटजवळ सरनामधील जसवालीत झाला होता.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज...