आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Yuvraj Singh NRI Relatives Beated In Chandigarh

युवराजसिंगच्या वडिलांना मध्यस्थी करणे पडले महाग, पोलिसांनी घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: युवराजचे नातेवाईक)

पंचकूला- टीम इंडियाचा स्टार फलंदाज युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग यांना पंचकूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पार्किंगवरून झालेल्या वादातून हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले व त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सेक्टर-2 मध्ये राहणा-या योगराज यांची बहिण व त्यांचे शेजा-यांना रविवारी रात्री पार्किंगवरून मारहाण झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्हीकडील पक्षांना ताब्यात घेतले. याबाबत सांगितले जात आहे की, योगराज समझोता करण्याच्या उद्देशाने पोलिस ठाण्यात गेले होते. तेथे पोलिसांनी कलम 323 नुसार अनाधिकृत प्रवेश आणि धमकावणे या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.
योगराज सिंग यांचे नातेवाईक एक महिन्यापूर्वी ब्रिटनहून भारतात आले आहेत. या एनआरआय नातेवाईकाने रिटायर्ड डीएसपी आशा आनंद व त्याच्या मुलावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, आशा यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे म्हटले आहे.

योगराज यांनी सांगितले की, माझी बहिण कुलजीत कौर, तिचा मुलगा एरन आणि मुलगी तान्या घरी येत होते. त्याचवेळी गाडी पार्क करताना घरासमोर राहणा-या रिटायर्ड डीएसपी आशा आंनद यांच्याशी वादावादी झाली. ये लोक माहिती देत असताना व बोलत असतानाच डीएसपीच्या मुलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे योगराज यांचे नातेवाईक भूपिंदर सिंह, एरन आणि तान्या यांना जखमा झाल्या. भूपिंदर सिंह यांच्या चेह-यावर जखम झाली तर, तान्या आणि एरनच्या डोके, मान व कमरेवर गंभीर मार लागला आहे.
पुढे पाहा, युवराज सिंगच्या नातेवाईकांना कशा पद्धतीने झाली आहे मारहाण...