आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Charges Mean More Likely To Get Elected, Gain Assets

गुन्‍हेगारी खटले असलेल्‍या आमदार आणि खासदारांमध्‍ये शिवसेना आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवढे जास्त गंभीर गुन्‍हे तेवढी विजयाची जास्‍त खात्री, असे निवडणुकीचे समीकरण झाले आहे. तसेच एका दशकात दोन वेळा निवडणुकीत उभे राहणा-या उमेदवारांची संपत्ती थोडी थोडकी नव्‍हे तर, 1000 पटीने वाढली आहे. त्‍यातही ज्‍यांच्‍यावर गंभीर गुन्‍हे आहेत, त्‍यांच्‍याबाबत हा निकष तंतोतंत लागू पडतो. नॅशनल इलेक्‍शन वॉच या संस्‍थेने केलेल्‍या एका सर्वेक्षणातून हा निष्‍कर्ष काढण्‍यात आला आहे. महत्त्वाची बाब म्‍हणजे, गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवार शिवसेनेनेच दिले असल्‍याचे या अहवालातून समोर आले आहे.

संस्‍थेने 2004 ते 2013 या कालावधीतील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमधील उमेदवारांचा अभ्‍यास करुन एक अहवाल तयार केला आहे. त्‍यात एकूण 62 हजार 847 उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी 4181 उमेदवारांनी पुन्‍हा निवडणूक लढविली. पुन्‍हा निवडणूक लढविणा-यांपैकी 1615 उमेदवारांची मालमत्ता 200 पटींनी वाढली. तसेच 684 जणांची मालमत्ता 500 पटींनी तर, 420 जणांची मालमत्ता 800 पटींपेक्षा जास्‍त वाढली. या उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्‍या शपथपत्रातील माहितीच्‍या आधारावरच हे निष्‍कर्ष काढण्‍यात आले आहेत.

शिवसेनेच्‍या एकूण 75 टक्‍के आमदार आणि खासदारांवर गुन्‍हेगारी खटले सुरु आहेत. त्‍यांनी शपथपत्रातूनच ही माहिती जाहीर केलेली आहे. शिवसेनेचे एकूण 137 आमदार आणि खासदार आहेत. त्‍यापैकी 103 जणांवर गुन्‍हे दाखल आहेत. हे प्रमाण इतर राजकीय पक्षांच्‍या तुलनेत सर्वाधिक आहे.

शिवसेनेनंतर क्रमांक लागतो बिहारमधील लालूप्रासद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा. लालुंच्‍या पक्षाच्‍या 125 आमदार आणि खासदारांपैकी 58 जणांवर गुन्‍हे दाखल आहेत. तर जदयूच्‍या 272 पैकी 120 जणांवर गंभीर गुन्‍हे दाखल आहेत.

काँग्रेसच्‍या 2451 आमदार आणि खासदारांपैकी 22 टक्‍के तर भाजपच्‍या 1689 पैकी 520 आमदार आणि खासदारांवर गुन्‍हे दाखल आहेत.