आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री गोरखधंद्याचे दुकानदार दिवसा हाेतात गोरक्षक, माेदींंनी मौन सोडले |

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरातच्या उना येथील दलित अत्याचाराच्या २५ दिवसांनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांकडून सुरू असलेल्या गुन्हेगारी मनमानीबद्दलचे मौन सोडले. गोरक्षकांच्या असमाजिक व्यवहारावर संताप व्यक्त करत या गोरक्षकांपैकी ७० ते ८० टक्के गोरखधंदे करतात. ते रात्रभर गोरखधंदे करतात. दिवसा गोरक्षक बनतात. कोणावरही अत्याचार करण्यासाठी सेवा असत नाही, असे मोदी म्हणाले. गेल्या काही दिवसांत गोरक्षणाच्या नावाखाली निष्पाप लोकांवर अत्याचाराच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. त्यामुळे मोदींच्या या विधानाला महत्त्व अाले आहे.

‘टाऊन हॉल’ कार्यक्रमात शनिवारी मोदी म्हणाले, गोरक्षणाच्या नावाखाली समाजकंटक दुकानदारी चालवत आहेत. राज्य सरकारांनी अशांचा संपूर्ण तपशील गोळा करावा. रात्रभर गोरखधंदे करणारे आपले काळे कारनामे लपवण्यासाठी दिवसा गोरक्षक बनतात. मोदींनी गाय वाचवण्याचे उपायही सांगितले. कापल्यामुळे जेवढ्या गायींचा मृत्यू होत नाही, त्यापेक्षा जास्त गायी प्लास्टिक खाल्ल्यामुळे मरत आहेत. जर खरेच गायींची सेवा करायची तर त्यांना पॉलिथीन पिशव्यांपासून वाचवा.लोकांना प्लास्टिक फेकण्यापासून परावृत्त करा.
पुढे वाचा... पंतप्रधान मोदी काय म्हटले...
> पर्यटन क्षेत्राला अशी द्या चालना
>देशात खेडी मरता कामा नये
>शेतीला आधुनिकतेची जोड
>विकासदराला सौर ऊर्जेचे बळ
>सुरक्षित आरोग्यावर भर हवाच
>विश्लेषण :मोदींचे वादावर उशिरा बोलणे हा नाइलाज की राजकारण?
बातम्या आणखी आहेत...