आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उप्रमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आमदार 24% घटले, कोट्यधीशांत 19% वाढ, 50 पेक्षा कमी वयाचे 50%

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यंदा उत्तर प्रदेश विधानसभेच्या निकालानंतर ठळक बदल दिसून आले आहेत. एडीआर आणि यूपी इलेक्शन वॉचच्या आकडेवारीकडे पाहता वर्ष २०१२ च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार २४ % घटले आहेत. तीन आमदार अपक्ष असून तिघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकले आहेत. कोट्यधीश उमेदवार १९ % वाढले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५० % उमेदवारांचे वय ५० पेक्षा कमी आहे, तर तितकेच पन्नाशी पार केलेले आहेत. ४०२ आमदारांपैकी ५० % ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.  

- ३६ % आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, २६% वर गंभीर गुन्ह्यांप्रकरणी खटले दाखल.
- आमदारांची सरासरी संपत्ती ३.३६ कोटींहून आता ५.९२ कोटी, ५ वर्षांत ७६% वाढ.
- गंभीर गुन्ह्यांत सर्वाधिक २७% भाजपचे, तर सर्वात कमी १४% काँग्रेसचे आहेत. 
- ८ लोकप्रतिनिधींविरुद्ध खून, तर ३४ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याची प्रकरणे आहेत.

सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ११४ उमेदवार भाजपमध्ये
उत्तर प्रदेशात ४०३ प्रतिनिधींपैकी १४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. यात १०७ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. धामपूरचे भाजप आमदार अरुण कुमार राणा या एकमेव प्रतिनिधीविरुद्ध महिलांविरुद्धच्या गुन्ह्याची नोंद आहे.  

३ अामदार अपक्ष, तिघेही आरोपी 
उत्तर प्रदेशात तीन अपक्ष आमदार निवडून आले. त्यात कुंडाचे राजा भैया, नौतनवाचे अमरमणी त्रिपाठी, बाबागंजचे विनोद कुमार यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये काही साम्ये आहेत.
- तिघेही कोट्यधीश आहेत. यांची एकूण संपत्ती ३१ कोटींपेक्षा अधिक आहे.  
- तिघे गंभीर  आरोपी आहेत.
- तिघांचे वय ३५-४५ दरम्यान आहे.
- तिघे किमान पदवीधर आहेत.  

संपत्ती : कोट्यधीश बसपमध्ये, भाजप तिसऱ्या स्थानी 
भाजपचे कोट्यधीश प्रतिनिधी सर्वाधिक आहेत. मात्र, टक्केवारीत बसप आघाडीवर आहे. बसपचे ९५% प्रतिनिधी कोट्यधीश आहेत. समाजवादी पार्टीचे ८५% आणि भाजपचे ७९% आमदार कोट्यधीश आहेत. काँग्रेसचे ७ पैकी ५ प्रतिनिधी कोट्यधीश आहेत.

शिक्षण: १७ लोकप्रतिनिधी पीएचडीधारक 
२९० म्हणजे ७२% प्रतिनिधी पदवीधर किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेले आहेत. २५% प्रतिनिधी ८ वी वा १२ वी पास. २ प्रतिनिधी अशिक्षित आहेत. दोघेही भाजप आमदार आहेत. १७ जण पीएचडीधारक आहेत.

शिक्षण -   आमदार
अशिक्षित -    2
साक्षर -     3
8वीं पास -    21
10वी पास - 31
12वी पास - 49
पदवीधर -    90
व्यावसायिक पदवीधर -    73
पदव्युत्तर पदवी - 110
पीएचडी - 17

वय: गंगा ज्येष्ठ, कुशाग्र सर्वात तरुण
४०२ आमदारांपैकी ५०% २५ ते ५० वर्षे वयोगटातील आहेत, तर बाकी ५१-८० वयोगटातील आहेत. भाजपचे ८० वर्षीय गंगा सर्वात ज्येष्ठ असून २५ वर्षीय कुशाग्र सर्वात तरुण आहेत.

वयोगट    आमदार
25-40    70
41-50    131
51-60    115
61-70    73
71-80    13
- ५१-६० वयोगटातील आमदारांची संख्या पूर्वीच्या तुलनेत ४३% वाढली आहे.
- २५-४० वर्षांच्या आमदारांची संख्या ५ वर्षांत १०% घट.
 
पुढील स्लाइडवर वाचा गरिब, श्रीमंत आणि गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या उमेदवारांबद्दल... 
बातम्या आणखी आहेत...