आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crorepati Candidates In New Delhi Assembly Election

दिल्‍लीच्‍या आखाड्यात कोट्यधीश \'कर्जदार\', शीला दीक्षितांकडे नाही कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गेल्‍या 15 वर्षांपासून दिल्‍लीची गादी सांभाळणा-या मुख्‍यमंत्री शीला दीक्षित यांच्‍याकडे स्‍वतःची कार नाही. तसेच त्‍यांचे वार्षिक उत्‍पन्‍न जवळपास 14 लाख रुपयेच आहे. त्‍यांची एकूण संपत्ती 2 कोटी 95 लाख 58 हजार रुपयांची आहे. ही माहिती शीला दीक्षित यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडलेल्‍या शपथपत्रात दिली आहे. त्‍यांचे प्रतिस्‍पर्धी म्‍हणून निवडणूक लढविणारे भारतीय जनता पक्षाचे मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांच्‍याकडे 37,79,597 रुपये संपत्ती असून एकूण स्‍थावर मालमत्ता 2 कोटी 42 लाख 48 हजार रुपयांची आहे. त्‍यांच्‍यावर 19 लाख 48 हजार रुपयांचे कर्जही आहे.

दिल्‍ली विधानसभा निवडणुकीच्‍या रणांगणात गुरुवारी शीला दीक्षित आणि डॉ. हर्षवर्धन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शीला दीक्षित यांच्‍या मंत्रिमंडळातील तीन सदस्‍य आरोग्‍य मंत्री अशोक वालिया, परिवहन मंत्री हारुन युसुफ आणि महिला, बालकल्‍याण मंत्री किरण वालिया यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. दिल्‍लीत गुरुवारपर्यंत कॉंग्रेसचे 27, भाजपचे 26, आम आदमी पार्टीचे 29 आणि बहुजन समाजवादी पार्टीच्‍या 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.