आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cross Firing At Indo Pak Border Home Minister Rajnath Singh Holds Meeting

पाकिस्तानचे शेपूट वाकडेच, सीमेवर गोळीबार सुरु; हजारो लोकांचे घरदारसोडून पलायन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील 57 भारतीय गावांमधील पाच हजार लोकांचा जीव शेजारी देशाकडून सुरु असलेल्या गोळीबाराने धोक्यात आला आहे. कठुआचे पोलिस उपायुक्त डॉ. शाहिद इकबाल यांनी याला दुजोरा दिला आहे. डॉ. इकबाल म्हणाले, पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहे. सध्या येथील सर्व शाळांना सुटी देण्यात आली असून पुढील सुचना मिळेपर्यंत शाळा बंद राहाणार आहेत. कठुआ येथील जवळपास 3700 लोकांना बुलेटप्रुफ गाडयांमध्ये बसवून सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून सोमवारी दुपारी दोन वाजतापासून सांबा, कठुआ आणि हिरानगर येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आणि आसपासच्या परिसरात गोळीबार सुरु आहे. यात एक बीएसएफ जवान शहीद झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात बीएसएफच्या तीन जवानांचाही समावेश आहे. पाकिस्तानकडून सोमवारी बीएसएफच्या सहा चौक्यांना निशाणा बनवण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या बोबियां येथे रविवारी रात्रीपासून राहून-राहून गोळीबार होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान नवीन चौक्यांवर गोळीबार करुन दहशतवाद्यांना दुसर्‍या मार्गाने घुसखोरी करण्याची संधी देत आहे. मात्र, बीएसएफ पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत असून पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावत आहे.
सीमेलगतच्या गावातून लोकांचे पलायन
बीएसएफने सांबा आणि कठुआ सेक्टरलगतच्या भागातील लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम सुरु केले आहे. सोमवारी दिवसभरात येथील 3500 लोकांना सुरक्षीत स्थळी पोहोचवण्यात आले. यातील 1800 लोकांना शरणार्थी शिबीरात ठेवण्यात आले आहे. सध्या असलेल्या कडाक्याच्या थंडीमध्ये शिबीरातील लोकांना थंडीपासून बचावासाठीची सर्व साधने प्रशासनाकडून पुरविण्यात आली आहेत.
गृहमंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी सकाळी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभल, रॉ आणि गुप्तसंस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत देशातील अंतर्गत सुरक्षेवरचर्चा करण्यात आली.
पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे..

संग्रहित छायाचित्र - भारतीय चेकपोस्टवर तैनात भारतीय जवान