नवी दिल्ली - बीएसएफ जवानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीआरपीएफच्या जितसिंह या जवानाचा व्हिडिओ आता चर्चेत आला. या व्हिडिओत या जवानाने निमलष्करी दलाला लष्करी जवानांच्या बरोबरीत वेतन व सुविधांची मागणी केली. देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) त्या जवानाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेण्यात आल्याचे गुरुवारी सांगितले.
बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांच्यानंतर आता सीआरपीएफ जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पॅरा मिलिटरी फोर्सचा जवान जीत सिंह याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लष्कराप्रमाणे आम्हालाही सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे. यावर सीआरपीएफ महासंचलाक दुर्गा प्रसाद म्हणाले, 'जवानाने जे मुद्दे उपस्थित केले त्यावर याआधीही चर्चा झाली आहे. आम्ही त्या मागण्या 7 व्या वेतन आयोगात पूर्ण करणार आहोत. जवानाने त्याच्या व्हिडिओमध्ये तक्रार केलेली नाही तर त्याची इच्छा व्यक्त केली आहे.'
जवानाने विचारले - आमच्यासोबत भेदभाव का
- मुथरेचा रहिवासी सीआरपीएफ जवान जीतसिंहने 25 डिसेंबर रोजी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
- त्यात जीतसिंहने म्हटले होते, 'मी कॉन्स्टेबर जीत सिंह सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्सचा (सीआरपीएफ) जवान आहे. तुमच्या माध्यमातून मी पंतप्रधानांपर्यंत माझा संदेश पोहोचवू इच्छितो. मला सहकार्य करा.'
- जवानाने त्याची व्यथा मांडताना म्हटले,'देशात अशी कोणती ड्यूटी आहे जी सीआरपीएफ जवान करत नाही. लोकसभा, राज्यसभा एवढेच नाही तर छोट्या - छोट्या ग्राम पंचायत निवडणूक बंदोबस्तासाठीही सीआरपीएफ तैनात केले जातात. याशिवाय व्हिआयपींची सुरक्षा, संसद भवन, विमानतळ, मंदिर, मशिद असे कोणतेच ठिकाण नाही जिथे सीआरपीएफ जवान आपले योगदान देत नाही.'
लोक दिवाळी साजरी करतात, आम्ही काश्मीर खोऱ्यात तैनात असतो
- जवानाने व्हिडिओमध्ये सीआरपीएफला दिल्या जाणाऱ्या सापत्न भावनेवर प्रकाश टाकला आहे. लष्कर आणि इतर पॅरा मिलिटरी फोर्स प्रमाणेच सर्व काम करुन त्यांच्यापेक्षा कमी सोयी-सुविधा आम्हाला का दिल्या जातात, असा सवाल तेजसिंह यांनी विचारला आहे.
- शासकीय शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना 50-50 हजार रुपये पगार दिला जातो. त्यासोबतच त्यांना सर्व सुट्यांचाही लाभ मिळतो. मात्र सीआरपीएफला ऐन दिवळीत काश्मीर खोऱ्यात तैनात केले जाते आणि सोयी सुविधांपासूनही वंचित ठेवले जात असल्याचा आरोप जवानाने केला आहे.
- लष्कराला निवृत्ती वेतन, कॅन्टिन या सुविधा निवृत्तीनंतरही मिळतात मात्र सीआरपीएफ जवानां यापासून दूर ठेवले गेले आहे, याचाही उल्लेख जवानाने व्हिडिओमध्ये केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा जवान जीतसिंह यांचा व्हिडिओ...