आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crude Oil Prices Slip Downs In International Market

पेट्रोल-डीझेल-एलपीजी होणार स्वस्त, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर घसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल 40 डॉलरपर्यंत घसतले आहेत. या घसरणीमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डीझेलचे दर आणखी घसरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, चीनच्या इकॉनॉमीमध्ये येणाऱ्या घसरणीमुळे क्रूड ऑइलचे दर घसरत आहेत. त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. भारतात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त होऊ शकते. अमेरिकेत सलग आठव्या आठवड्यात ऑइलचे दर घसरले आहेत.

अमेरिकेतही घसरण
1986 नंतर अमेरिकेच्या ऑइल मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या काळासाठी घसरण राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रुपया मजबूत होण्यास मदत मिळू शकते. गेल्या आठ आठवड्यांमद्ये अमेरिकेत क्रूड ऑइलच्या दरांमध्ये जवळपास 33 टक्के घसरण झाली आहे. गेल्या दीड वर्षामध्ये क्रूड ऑइल सेक्टरमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. ब्रेंट ऑइल प्राइसमध्येही 2.75 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे दर 45.33 प्रति बॅरल झाले आहेत. मार्च 2009 नंतर प्रथमच हे दर प्रति बॅरल 45 डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

सरकारसाठीही चांगली बातमी
ऑइलच्या दरांमध्ये आलेली घसरण हे भारत सरकारसाठीही चांगले संकेत आहेत. त्यामुळे सरकारचा पैसा वाचेल आणि त्याचा वापर वेलफेअर प्रोग्रामसाठी केला जाऊ शकेल. तसेच कॉर्पोरेट सेक्टरलाही त्याचा फायदा होईल. बँकाही व्याजदर कमी करू शकतात. भारताला गरज असलेल्या क्रूड ऑइलपैकी 80 टक्के क्रूड ऑइल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या दराचा थेट फायदा भारताला होऊ शकेल. जुलैपासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या दरांमध्ये आलेल्या घसरणीमुळे सरकारला 1.5 लाख कोटींचा फायदा झाला आहे. सरकार शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण यावर हा पैसा खर्च करू शकेल.