आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! बँक पासवर्ड चोरणा-या ‘क्रायडेक्स’व्हायरसचा धुमाकूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वैयक्तिक लॉगइन आणि पासवर्ड चोरणा-या तसेच त्यावर हल्ला करणा-या व्हायरसपासून सावध राहावे, असा सल्ला सर्ट-इन या भारतीय सायबर सुरक्षा प्रतिसाद दलाने दिला आहे. कर्मचा-यांनी देशातील ई- बँकिंग युजर्सना दिला आहे. ‘क्रायडेक्स’ असे या व्हायरसचे नाव आहे. हा व्हायरस विविध बँका तसेच सोशल नेटवर्किंग साइट्सवर हल्ला करतो. देशात हा व्हायरस झपाट्याने पसरत चालला आहे. क्रायडेक्स हा ई- बँकिंगची माहिती चोरणारा ट्रॉजन आहे. एकदा अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तो लॉगइनची गोपनीय माहिती चोरतो.