आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CSDS Survey, Tight Race Between BJP AAP In Loksabha Election Delhi

SURVEY: दिल्लीत \'BJP-APP\'मध्ये टफ फाईट, केजरीवालांची लोकप्रियता घटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सीएसडीएसने केलेल्या ताज्या सर्वेनुसार, आम आदमी पक्षाची लोकप्रियता घटलेली आहे. सीएसडीएसने आम आदमी पक्ष आगामी लोकसभेत काय परिणाम करू शकते हे शोधण्यासाठी 6 राज्यांतील लोकांशी चर्चा केली. यावरून निष्कर्ष असा काढण्यात आला आहे की, आपची व केजरीवाल यांची लोकप्रियता घटली आहे.
जानेवारीत दिल्लीत 48 टक्के मते मिळण्याचा अनुमान काढण्यात आला होता. तो, फेब्रुवारीत 35 टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात आपला 5 टकके लोकांनी तर बिहारमध्ये तीन टक्के लोकांनी पाठिंबा दिला होता तो ताज्या पाहणीत कायम आहे. तामिळनाडूत 3 टक्केवरून 2 तर आंध्र प्रदेशमध्ये 2 वरून 1 टक्क्यांवर मते मिळतील असे सर्वेत म्हटले आहे.
दिल्लीतील लोकांत केजरीवालांची जादू कमी कमी होत चालली आहे. 44 टक्के लोकांना केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आवडलेला नाही. 47 टक्के लोक हे मानतात की लोकसभेत यश मिळावे म्हणूनच केजरीवालांनी राजीनामा दिला आहे. मात्र असे असले तरी दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या तर केजरीवालांच्या पक्षालाच मत देणार असल्याचे बहुतेक लोक म्हणत आहेत.
पुढे वाचा, मुंबई आणि महाराष्ट्रात कसे असेल चित्र...