आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cutting Hand Successful Operation In Delhi Hospital

शरीरापासून तुटलेला हात पुन्हा जोडला; दिल्लीत सहा तासांची यशस्वी शस्त्रक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एका जबरदस्त कार अपघातात दिल्लीचे डॉक्टर महेंद्र नारायणसिंह यांचा हात चक्क धडापासून वेगळा झाला; परंतु त्याही स्थितीत धैर्य न गमावता ते धाडसाने परिस्थितीला सामोरे गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे गमावलेला हात त्यांना परत मिळाला. सर गंगाराम रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर सहा तासांत हात जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली.

व्यवसायाने किडनी विकारतज्ज्ञ असलेले 32 वर्षीय डॉक्टर महेंद्र नारायणसिंह त्यांच्या 80 वर्षीय वडिलांना घेऊन उत्तर प्रदेशातील आग्राजवळील टुंडला येथून दिल्लीकडे येत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास नोयडाजवळ समोरून वेगाने आलेल्या व्ॉगनआरने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यात त्यांचे वडील किरकोळ जखमी झाले, परंतु डॉ. महेंद्र यांचा हात धडावेगळा झाला.

त्या परिस्थितीही त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांनी वडिलांच्या मदतीने वाहणारे रक्त प्रथम थांबवण्यासाठी उपाययोजना केली. नंतर तुटलेला होत शोधून काढला. जखमी अवस्थेत त्यांनी तो हात जवळच्या कैलास रुग्णालयात एका कोल्डबॉक्समध्ये ठेवला. नंतर तो बॉक्स घेऊन ते सर गंगाराम रुग्णालयात दाखल झाले. तेथे आधीच तैनात असलेल्या डॉ. महेश मंगल यांच्या पथकाने सहा तासांच्या अथक पर्शिमानंतर डॉ. सिंह यांचा तुटलेला हात पुन्हा शरीराला जोडला.

कशी झाली शस्त्रक्रिया
हाडे व प्लास्टिक सर्जरीच्या सात डॉक्टरांच्या पथकाने सर्वप्रथम तुटलेल्या हातांची हाडे जोडली. त्यानंतर शरीरातील नसा जोडल्या.

अवयव तुटल्याच्या दरवर्षी 30-40 केसेस
सर गंगाराम रुग्णालयात अवयव जोडण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या होत असतात. येथे दरवर्षी जवळपास 30 -40 केसेस येतात. रुग्ण जर त्याच्या शरीराचा तुटलेला भाग त्वरित सोबत आणत असेल तर ते सहजरीत्या जोडले जाऊ शकते. डॉ. महेश मंगल, प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष