आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणाबाबत कॉंग्रेसची महत्त्वाची बैठक मंगळवारी, अंतिम निर्णय होण्‍याची शक्‍यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- तेलंगणा राज्‍य निर्मितीबाबत कॉंग्रेसच्‍या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक उद्या (मंगळवार) सायंकाळी होणार आहे. या बैठकीत तेलंगणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

कॉंग्रेसच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दुपारी 4 वाजता युपीएच्‍या समन्‍वय समितीची बैठक होणार आहे. त्‍यानंतर सायंकाळी 5.30 वाजता कार्यसमितीची बैठक होणार आहे. तेलंगणा राज्‍य निर्मितीकडे कॉंग्रेसच्‍या हायकमांडचा कल असून पक्षांतर्गत विरोध झुगारून याबाबत निर्णय होऊ शकतो.

समन्‍वय समितीच्‍या बैठकीद्वारे तेलंगणाच्‍या निर्णयाबाबत सहकारी पक्षांचे मत जाणून घेण्‍याचा कॉंग्रेसचा प्रयत्‍न आहे. त्‍यानंतर कार्यकारी समितीच्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने यापूर्वीच तेलंगणा निर्मितीला सहमती दर्शविली आहे. तसेच आरएलडीनेही पाठींबा दिला आहे.

वेगळ्या तेलंगणा राज्‍याची निर्मितीची जुनी मागणी आहे. ती लवकरच सत्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे. हैदराबादला केंद्रशासित प्रदेश करुन तेलंगणाची निर्मिती करण्‍यात येऊ शकते. हैदराबादचा तेलंगणामध्‍ये समावेश करण्‍याबाबत विरोध होता. त्‍यामुळे आतापर्यंत तेलंगणावर निर्णय झाला नाही. आता त्‍यावर अशा पद्धतीने तोडगा काढण्‍यात येत आहे.