आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyber Attack, Hacking : Government Appointing 4500 Cyber Expertment

सायबर हल्ला, हॅकिंग : सरकार नेमणार 4500 सायबर तज्ज्ञ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारी खात्यांच्या संकेतस्थळांवर होणा-या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी काळात 4500 नवीन सायबर तज्ज्ञांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.


सायबर तज्ज्ञांची नियुक्ती प्रामुख्याने अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण विभागाशी संबंधित असतील. त्यातही माहिती-तंत्रज्ञान, दूरसंचार, गुप्तहेर, एनटीआरओ आणि संरक्षण मंत्रालयाचे संरक्षण संशोधन ब्युरोचा समावेश आहे. सायबर हल्ल्याची सर्वाधिक शिकार झालेल्या जगातील पहिल्या चार देशांत भारताचा चौथा क्रमांक लागतो. सायबर सुरक्षेच्या पातळीवर भारत अमेरिकेशी सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच भारत दौ-यावर असलेल्या जॉन केरी यांच्यासोबत सायबर सुरक्षेवरदेखील चर्चा होणार आहे. भारत -अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर चर्चा होत आहे. त्यात सायबर सुरक्षा हादेखील एक मुद्दा समाविष्ट असल्याची माहिती परराष्ट्र विभागाचे संयुक्त सचिव विक्रम दुरईस्वामी यांनी सांगितले. नवीन नियुक्तीमधील 1800 तज्ज्ञ संरक्षण मंत्रालय किंवा या विभागाशी संबंधित विभागात नियुक्त केले जाणार आहेत. त्याशिवाय सुमारे 700 तज्ज्ञ एनटीआरओ (राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्था) यामध्ये नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान कार्यालयांतर्गत कार्य करणारे एनटीआरओ देशात सुरक्षेसंबंध प्रकरणात देखरेख करणारी सर्वाेच्च सरकारी संस्था आहे.


अलीकडेच या संस्थेचे प्रमुख सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आर. चंद्रशेखर यांना बनवले होते. ते याअगोदर माहिती-तंत्रज्ञानाचे सचिव म्हणून कार्यरत होते. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात त्यांची योग्यता व सजगतेवरून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हेदेखील त्यांच्या नियुक्तीमागील मोठे कारण आहे. मृदुभाषी परंतु आपल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेपाला विरोध करणारे चंद्रशेखर यांनी आंध्र प्रदेशातील माहिती तंत्रज्ञानाला उभे करण्यात निर्णायक भूमिका वठवली आहे. दरम्यान, गुप्तहेर विभागात सुमारे सहाशे सायबर सुरक्षा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आपण चीनच्या तुलनेत तोकडे असलो तरी नवीन नेमणुकांमुळे आपल्या सुरक्षेचे परीघ आणखी मजबूत करू शकतो, असा विश्वास एका अधिका-याने व्यक्त केला आहे.