आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cyber Challenges: Pakistan Hacking Information In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायबर आव्हान: भारतात चालते पाकिस्तानची ऑनलाइन घुसखोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आपल्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे उघड झाले आहे. बीएसएनएलच्या एका अधिकार्‍याला आलेल्या फोनमुळे ही बाब स्पष्ट झाली आहे.

गेल्या महिन्यातील ही घटना आहे. संरक्षण मंत्रालयाच्या 011-23016782 या क्रमांकावरून हा फोन आला. फोन करणारा स्वत:ची ओळख मेजर विजय कुमार अशी सांगत होता. संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळामध्ये काहीतरी गोंधळ आहे. कृपया मला माझ्या जी मेल अकाउंटवरील लिंक पाठवून द्या. जेणेकरून संरक्षण मंत्रालयाच्या मोहिमेत ही माहिती कामी येऊ शकेल, असे फोनवरील व्यक्तीने तिकडून सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीस अडचण येऊ नये म्हणून तांत्रिक विभागाचा क्रमांक देण्यात आला. त्यानंतर तपास संस्थेने बीएसएनएलच्या त्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची सूचना केली, परंतु ज्या वेळी संरक्षण मंत्रालयातून त्या अधिकार्‍याला फोन करण्यात आला होता. त्या वेळी त्या मोबाइलवरून एकही कॉल झालेला नव्हता. याचा अर्थ आयएसआयच्या एजंटने त्या क्रमांकाचा क्लोन करून बीएसएनएल अधिकार्‍याशी संपर्क साधला.

मेजरचे सोंग
फोनवरून मेजर विजयकुमार अशी ओळख सांगणारा व्यक्ती आयएसआयचा माणूस होता, असे स्पष्ट झाले आहे. त्याने मेजरचे सोंग घेऊन बीएसएनएलच्या अधिकार्‍याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता.


व्हायरसमुळे ऑनलाइन घुसखोरी उजेडात
मेजर विजयकुमार यांच्या नावावर संपर्क साधणार्‍या या व्यक्तीने बीएसएनएलच्या सर्व्हरमध्ये स्टेड अँड टेल्को सिस्टिमच्या साह्याने व्हायरस मालवेअर आणि स्पायवेअर टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्या हालचालींचा भारतीय गुप्तहेर यंत्रणेला संशय आला. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी एमआयला ही माहिती कळवली. कोणाकडून तरी हॅकिंग केली जात आहे, अशी सूचना गुप्तहेर विभागाकडून देण्यात आली. त्यानंतर ‘रॉ’ ने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तेव्हा या मागे आयएसआयचा हात असल्याचे स्पष्ट झाले.