आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyber Crime, Change Internet Setting, News In Marathi

सायबर हेरगिरी: 60 दिवसांत बदलावी लागणार इंटरनेट सेटिंग, दूरसंचार विभागाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फिक्स्ड लाइन ब्रॉडबँड ग्राहकांना आपल्याकडील मोडेमचा पासवर्ड आणि अन्य सेटिंग 60 दिवसांच्या आत बदलावी लागेल, असा इशारा दूरसंचार विभागाने दिला आहे. सायबर हेरगिरीच्या शक्यता असल्यामुळे विभागाकडून 11 मार्चलाच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. देशातील 1.45 कोटी ग्राहक ब्रॉडबँड मोडेमचा वापर करतात. दूरसंचार विभागाने दिलेल्या आदेशानुसार, इंटरनेट सेवा प्रदाता कंपनीकडून ‘आयएसपी’चे पासवर्ड बदलण्यासाठी ग्राहकांना मदत करावी लागेल.

या आदेशाचे पालन 60 दिवसांच्या आत करावे लागेल. इंडियन इन्फोसेक कन्सोर्टियम या सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार देशातील 3 हजार इंटरनेट कनेक्शनशी छेडछाड झाली आहे. यात संरक्षण मंत्रालय, सुरक्षा संस्था आणि दिल्लीती बँकाच्या इंटरनेट कनेक्शनचा समावेश आहे. या कनेक्शनची विदेशातून हेरगिरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबतचा अहवाल केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांना सोपवण्यात आला असून त्यानंतरच इंटरनेट कनेक्शन असलेल्या उपकरणांचे पासवर्ड, सेटिंग बदलण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.

इंटरनेट वापरामुळे देशात आर्थिक पारदर्शकता येईल
बँकिंग आणि आर्थिक सेवा उद्योगात (बीएफएसआय) इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे अधिक पारदर्शकता आणि खर्चात बचत होईल, अशी माहिती डन अँड ब्रॅड स्ट्रीटच्या (डी अँड बी) एका अहवालात देण्यात आली आहे. डी अँड बीने केलेल्या सर्वेक्षणात समाविष्ट सुमारे 84 टक्के व्यावसायिकांनी इंटरनेट सर्वात महत्त्वपूर्ण माध्यम असून याद्वारे पुरवठा प्रणाली अधिक चांगली करता येऊ शकते, असे म्हटले आहे. अहवालाच्या मते, बाजारातील व्यवहार वाढवण्यासाठी बीएफएसआय कंपन्यांसाठी तंत्रज्ञान आणि पुरवठा माध्यमांवरील कार्यप्रणाली वाढवणे आणि खर्च कमी करणे ही प्राथमिक गरज बनली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, मोबाइल उपकरणे आणि इतर सुविधांच्या माध्यमांतून होणारा व्यवहार नोव्हेंबर 2013 पर्यंत 71.6 लाखांवर पोहोचला आहे. यापूर्वी एप्रिल 2011 मध्ये ही संख्या 10.8 लाख इतकीच होती.

मोबाइलचा प्रचंड प्रसार झाला असल्यामुळे त्या तुलनेत ही आकडेवारी तोकडीच आहे. परंतु येत्या काळात मोबाइलवरून व्यवहार करण्याबाबत ग्रामीण आणि निमशहरी भागात मोठ्या प्रमाणात प्रसार होईल, असे मतही आरबीआयकडून व्यक्त करण्यात आले आहे.

> 84 % व्यापार्‍यांनी इंटरनेट हे पुरवठा प्रणालीचे उत्कृष्ट माध्यम असल्याचे सांगितले.
> 71.6 लाखांवर पोहोचली आहे मोबाइल उपकरण तसेच इतर सुविधेद्वारा व्यवहारांची संख्या

3 लाख कनेक्शन धोक्यात
देशात सध्या 1.45 कोटींपेक्षा जास्त ब्रॉडबँड मोडेमधारक आहेत. तज्ज्ञांच्या मते, यापैकी दिल्लीतील सुमारे 3 लाख इंटरनेट कनेक्शन धोकदायक स्थितीत आहेत. कारण हे सर्व कनेक्शन एकाच प्रकारच्या मोडेमचा वापर करतात.