आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cycle And Yoga Should Complusory In Country, Mahajan Brothers Demand To PM

सायकल आणि योगा देशात अनिवार्य करा, नाशिकच्या महाजन बंधूंची पंतप्रधानांकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नाशिकचे सायकलपटू डॉक्टर बंधू हितेंद्र आणि महेंद्र महाजन यांनी मंगळवारी पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ‘सायकल आणि योगा’ हे देशातील लोकांसाठी अनिवार्य करण्याबाबतही चर्चा केली.

डॉ. हितेंद्र यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले की, कार किंवा दुचाकी वाहन हे लोकांनी गरज म्हणून स्वीकारले आहे. आम्ही अमेरिकेतील सायकल स्पर्धा जिंकली मात्र त्यामागे प्रत्येकाला आरोग्य मिळावे हा उद्देश आहे. ४ हजार ८६० कि.मी. ची सायकल स्पर्धा ९ दिवसांत पूर्ण केली. दर दिवशी ५५० ते ६०० कि.मी. चे अंतर कापले. पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केल्याने आमचाही हुरूप वाढला आहे. दिंडोरीचे खासदार हरिचंद्र चव्हाण आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने आज पंतप्रधानांची भेट घेता आली. पंतप्रधानांनी आमचे कौतुक केले.

सायकल वापरणाऱ्यांना जादा गुण, वेतनवाढ द्या-महाजनांची सूचना : आज शालेय विद्यार्थीसुद्धा स्कूटर, मोटारसायकलने शाळेत जातात. या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना सुचविले की, ८ ते १२ वी पर्यंतचे जे विद्यार्थी शाळेत सायकलने येतील त्यांच्या गुणांमध्ये ५ टक्के वाढ द्यावी. जे शिक्षक शाळेत सायकलने येतील त्यांना जास्तीची वेतनवाढ देण्यात यावी. सर्वच शासकीय, निमशासकीय सेवा क्षेत्रातही हाच नियम लावावा. उद्योगक्षेत्रातही उद्योगपतींना याबाबत आग्रह धरावा, अशी विनंतीही केल्याचे डॉ. हितेंद्र यांनी सांगितले. महाजन बंधूंसोबत खासदार गोडसे, खासदार चव्हाण, किरण चव्हाण उपस्थित होते.