आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyclone Hudhud: PM Narendra Modi To Go On An Aerial Survey Today

\'हुदहुद\'मुळे विशाखापट्टणम् उध्वस्त, पाणी 100 तर दुधाची 80 रुपये लीटरप्रमाणे विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी होत आहे.

नवी दिल्ली/विशाखापट्‌टणम -
दक्षिण भारतात हुदहुद वादळाने विशाखापट्टणममध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. वादळामुळे आतापर्यंत 22 जण ठार झाले आहेत. त्यापैकी 16 जण विशाखापट्टणमचे आहेत. शहरातील विमानतळाची सर्वाधिक हानी झाली असून, मोबाईल आणि वीजव्यवस्था कोलमडली आहे. याठिकाणी जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पाणी 100 रुपये प्रतिलीटर तर दूध सुमारे 80 रुपये लीटर प्रमाणे विक्री केले जात आहे.
रुग्णालयांत वादळातील पिडितांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच रोजच्या जीवनावश्यक वस्तु मिळवण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी विशाखापट्टणमचा दौरा करणार आहेत. पाहणी केल्यानंतर मोदी एक आढावा बैठक घेणार असून विशाखापट्टणमचे पुर्वसन करण्याबाबतची रुपरेषा मोदींसमोर मांडली जाणार आहे.
हवामान विभागाच्या इशा-याने हानी कमी झाली
शक्यतेच्या तुलनेत या वादळामुळे कमी प्रमाणात नुकसान झाले. त्याचे कारण म्हणजे हवामान विभागाने अत्यंत तंतोतंत माहिती दिली होती. हवामान विभागाचा याबाबतचा अंदाज नासापेक्षाही तंतोतंत ठरला. नासाने 10 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीत, वादळ 12 ऑक्टोबरला आंध्रच्या किनारपट्टीवर येणार असे सांगितले होते. पण निश्चित स्थळाबाबत काहीही सांगण्यात आले नाही. तसेच वादळ ताशी 185 किमी वेगाने येईल आणि फायलीन वादळाप्रमाणे त्याचे स्वरुप असेल असेही नासाने म्हटले होते. त्याउलट हवामान विभागाने 6 ऑक्टोबरलाच याबाबत माहिती दिली होती. तर 10 ऑक्टोबरला हे वादळ विशाखापट्टणच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे सांगितले होते. हवेचा वेग ताशी 195 किमी असेल असे सांगितले होते. तसेच फायलीनएवढी तीव्रता नसेल असेही सांगण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, वादळामुळे विशानापट्टणममध्ये झालेल नुकसान