आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फैलिन'मुळे ओडीशाला अतिदक्षतेचा इशारा; विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची शक्‍यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पश्चिम बंगालच्‍या किनारपट्टीवर निर्माण झालेल्‍या फैलिन चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून येत्‍या दोन ते तीन दिवसांमध्‍ये ओडीशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्‍ये अतिवृष्‍टीचा इशारा देण्‍यात आला आहे. छत्तीसगढ, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात आली आहे. मच्‍छीमारांना समुद्रात न जाण्‍याचा सल्‍लाही देण्‍यात आला आहे.

हवामान खात्‍याने‍ दिलेल्‍या माहितीनुसार, फैलिन चक्रीवादळ येत्‍या 12 तासांमध्‍ये आणखी तीव्र होणार असून आंध्र प्रदेश आणि ओडीशा या राज्‍यांच्‍या किनारपट्टीवर ते 12 ऑक्‍टोबरला रात्रीपर्यंत धडकणार आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडीशाला बसण्‍याची शक्‍यता आहे. ताशी 150 किमी वेगाने वारे वाहू शकतात. तसेच अतिवृष्‍टीचाही इशारा देण्‍यात आला आहे. फैलिनच्‍या परिणामामुळे सीमांध्र, तेलंगणा, छत्तीसगढ, विदर्भ आणि मराठवाड्यात 48 तासांमध्‍ये मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्‍यात आली आहे. गुजरात आणि केरळमध्‍येही पावसाची शक्‍यता आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहालाही अतिवृष्‍टीचा इशारा देण्‍यात आला आहे.

12 ऑक्‍टोबरला धोका

फैलिन 12 ऑक्टोबरला ओडीशाच्‍या किनारपट्टीला धडकणार आहे. हा दिवस धोक्‍याचा आहे. या दिवशी वादळाची तीव्रता सर्वाधिक राहणार असून ताशी 175 ते 185 किमी वेगाने वारे वाहू शकतात. त्‍यामुळे ओडीशाला अतिदक्षतेचा इशारा देण्‍यात आला आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्‍या मच्‍छीमारांना तत्‍काळ परतण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. राज्‍य सरकारने 14 जिल्‍ह्यांमध्‍ये सरकारी कर्मचा-यांच्‍या दसरा आणि इतर सर्व सुट्टया रद्द केल्‍या आहेत. आपातकालीन यंत्रणा सज्ज ठेवण्‍यात आली आहे.