आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूंच्‍या अटकेनंतर तुटला वंझारांचा संयम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बनावट चकमकप्रकरणी तुरुंगात असलेले आयपीएस अधिकारी डी. जी. वंझारा यांच्‍या पत्रावरुन राजकारण सुरु झाले आहे. राज्‍यसभेत या मुद्यावरुन गदारोळ झाला. त्‍यानंतर कामकाज तहकूब करण्‍यात आले. समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दल आणि सीपीएमच्‍या सदस्‍यांनी या मुद्यावरुन चर्चेची मागणी केली होती. ती फेटाळण्‍यात आली होती. त्‍यामुळे राज्‍यसभेचे कामकाज सुरु होताच गदारोळ झाला आणि कामकाज तहकूब करण्‍यात आले.

वंझारा यांच्‍या पत्रावरुन भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्‍याचे प्रयत्‍न सपा, जेडीयू आणि इतर पक्षांनी सुरु केले आहेत. वंझारा यांनी पत्रामध्‍ये गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍यावर आरोप केले होते. भाजपने मात्र हा मुद्दा राज्‍याशी संबंधित असल्‍यामुळे संसदेत चर्चेला विरोध केला होता. त्‍यामुळे या डावपेचांना उत्तर म्‍हणून भाजपने हरियाणा येथील आयएएस अधिकारी अशोक खेमका यांचा मुद्दा संसदेत उचलण्‍याची तयारी केली आहे. वेंकय्या नायडू यांनी राज्‍यसभेत या विषयावर चर्चा करण्‍यासाठी नोटीस दिली आहे.

.