आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चमध्ये महागाई भत्ता 2 ते 4 टक्के वाढणार!, कर्मचारी संघटनांची मात्र नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात मार्चमध्ये २ ते ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
 
कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइजचे अध्यक्ष के. के. एन. कुट्टी यांनी म्हटले आहे की, कर्मचारी संघटनांच्या झालेल्या बाेलणीनुसार या भत्त्यात २ टक्के वाढ होईल. १ जानेवारी २०१७ पासून ही वाढ लागू केली जाईल. या वाढीवर कुट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महागाई भत्त्याच्या वाढीसाठी प्रमाण मानला जाणारा औद्योगिक कामगारांचा ग्राहक मूल्य सूचकांक या वाढीच्या तुलनेत फार दूर आहे. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत याबद्दल कामगार, कृषी मंत्रालयातच मतभेद आहेत. तडजोडीच्या सूत्रानुसार महागाईच्या १२ महिन्यांतील सरासरीच्या आधारे केंद्र सरकार हा भत्ता निश्चित करते. मात्र, सरकार याचा काटेकोरपणे विचार करत नाही. वास्तविक महागाईचा दर पाहिला तर भत्त्यातील वाढ किमान २.९५ टक्के असायला हवी. मात्र, सरकारने २ टक्क्यांवरील ९५ अंशाचा विचारच केला नसल्याचे कुट्टी म्हणाले.
 
५० लाख कर्मचारी, पेन्शनधारक
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारच्या विविध विभागांत कार्यरत ५० लाख कर्मचारी व ५८ लाख पेन्शनधारकांना होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या प्रमाणात हा महागाई भत्ता दिला जातो. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...