आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादरी हत्याकांडातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू; पोलिस म्हणाले, किडनी फेल होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दादरी हत्याकांडातील एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रवि सिसोदिया (22) असे मृत आरोपीचे नाव आहे. किडनी फेल झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याला श्वसनाचाही त्रास होत होता.

ज्यूडीशियल कस्टडीतच झाला होता रवी सिसोदियाच्या मृत्यू?
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी रवी सिसोदिया याचा मृत्यू ज्यूडीशियल कस्टडीतच झाला होता.
- लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलचे सुप्रिटेंडेंट डॉ.जेसी पासी यांनी सांगितले की, 'रवीला दुपारी 12 वाजता हॉस्पिटलमध्ये आणले होती. त्यावेळी त्याची प्रकृती खूप खालावली होती. त्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.’
- ‘त्याच्या दोन्ही किडन्या फेड झाल्या होत्या. तसेच ब्लडप्रेशर ही वाढले होते. उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता. अशातच संध्याकाळी 7 वाजता त्याचा मृत्यू झाला.
- रवीला गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ज्यूडीशियल कस्टडीत ठेवण्यात अाले होते.
- जरचा ठाण्याचे एसएचओ प्रदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, ‘त्याला नोएडा जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. पण तिथे त्याची प्रकृती आणखी खालावली. नंतर त्याला दिल्लीत हलवण्यात आले होते.

डेंगू झाल्याचा अंदाज...
- डॉ. पासी यांनी सांगितले की, ‘रवीचे मेडिकल रिपोर्ट यायचे आहेत. त्यांचा डेंगूही असल्याचा अंदाज आहे.
- रवीचे डेंगू आणि चिकनगुनियाच्या टेस्टचे रिपोर्ट बुधवारी‍ मिळतील. त्यात सर्व स्पष्ट होईल, असे डॉ. पासी यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील दादरी येथे घरात गोमांस ठेवण्याच्या अफवेवरुन अखलाक (50) याची ठेचून हत्या करण्यात आली होती. त्याच्या 22 वर्षांच्या मुलालाही बेदम मारझोड करण्यात आली होती. या प्रकरणी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला होता.

उत्तर प्रदेश सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, मोहंमद अखलाक याच्या घरात सापडलेले मांस हे गोमांस नसून मटण असल्याचे स्पष्ट झाले. प्रथमदर्शनी पाहता अखलाकच्या घरातील मांस हे शेळी किंवा तत्सम प्रजातीच्या प्राण्याचे असल्याचे या अहवालात सांगण्यात आले.

पुढील स्लाइडवर वाचा, काय सांगितले होते मृत अखलाकच्या पत्नीने...
बातम्या आणखी आहेत...