आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dail To Cylinder, Lpg Portability 5kg Lpg Cylinders At Petrol Pumps In Delhi

एका फोन कॉलवर मिळणार एलपीजी सिलिंडर, अल्पबचतीच्या व्याजदरात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजत असतानाच सरकारने टपाल कार्यालयातील मुदत ठेवी, अल्पबचतीवरील व्याजदरात 0.20 टक्के वाढ केली आहे. त्यासोबतच बुधवारपासून चार शहरांमध्ये 'डायल ए सिलिंडर' योजना सुरु केली आहे. पोस्ट ऑफिस एफडी या नावाने गुंतवणूकदारांत प्रिय असणार्‍या विविध योजनांवर ही व्याजदर वाढ एक एप्रिलपासून लागू होणार आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर गतवर्षीचेच 8.70 टक्के कायम ठेवण्यात आले आहेत.
काय आहे योजना
'डायल ए सिलिंडर' योजनेंतर्गत कोणतीही व्यक्ती एक फोन करुन गॅस सिलिंडर मागवू शकते. फोन केल्यानंतर पुढील दोन तासांत बाजारभावानुसार सिलिंडर मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेंतर्गत 5 किलो ग्रॅमचे सिलिंडर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पुढील टप्प्यात 14 किलो आणि 19 किलोचे सिलिंडर दिले जाणार आहे. या योजनेचा उद्देश ग्राहकांच्या मागिणीनुसार सिलिंडरचा पुरवठा करणे आहे.
कसा घेणार योजनेचा फायदा
पाच किलोंचे छोटू सिलिंडर मागवण्यासाठी ग्राहकांना 1800224344 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. सध्या लागू करण्यात आलेल्या चारही शहरांमध्ये हाच क्रमांक डायल करावा लागेल. पहिल्या टप्प्यात ही योजना दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये लागू करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, व्याजदर वाढ एक एप्रिलपासून