आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते अपघातांत रोज ४०० मृत्यू, २ वर्षांत काहीही बदलले नाही - गडकरींची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात दररोज सरासरी ४०० लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वर्षाकाठी दीड लाख लोक प्राण गमावतात. सदोष अभियांत्रिकी (रस्तेबांधणी) हे त्यामागचे मोठे कारण आहे. समर्पित कार्य आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही गेल्या दोन वर्षांत काहीच बदलले नसल्याची कबुली केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०१५ मध्ये भारतातील रस्ते अपघात अहवाल जारी करताना दिली. या वेळी त्यांनी अपघात राेखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांची माहिती दिली.

उपाय योजना : रोज १० हजार पॅसेंजर कार युनिट ट्रॅफिकच्या ठिकाणी चारपदरी हायवे. रस्ते बांधणीतील चुकांची दुरुस्ती. राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९६ हजारवरून २ लाख किमी करणार. हायवेंवर कॅमेरे बसवणार. सुमारे ७२६ ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी ११ हजार कोटींची तरतूद.

थ्रीडी स्पीडब्रेकर : सदोष गतिरोधकांमुळे हाेणारे अपघात बघता अाता रस्त्यांवर थ्रीडी गतिरोधके बसवण्याचा विचार सुरू आहे. वेगाने वाहने पळवणाऱ्या चालकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर कॅमेरे बसवले जाणार. मोटार वाहन कायद्यातील तरतुदी आणखी कठोर केल्या जाणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...