आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - दैनिक भास्कर समूहाची तिसरी पॉवर कॉन्क्लेव्ह गुरूवारी (ता .28 )नवी दिल्लीत होत आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) ज्योतिरादित्य सिंधिया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विशेष निमंत्रित राहतील. यंदा कॉन्क्लेव्हमध्ये मध्य प्रदेश ‘फोकस स्टेट’ आहे. पॉवर कॉन्क्लेव्हमध्ये दरवर्षी एका राज्यातील विजेच्या परिस्थितीवर विचार केला जातो. पहिल्या कॉन्क्लेव्हमध्ये छत्तीसगड व राजस्थान तर दुस-या कॉन्क्लेव्हमध्ये हरियाणाला फोकस स्टेटचा दर्जा होता.
नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी 11 वाजता कॉन्क्लेव्हला प्रारंभ होईल सायंकाळी सहापर्यंत चालणा-या कॉन्क्लेव्हमध्ये तीन सत्रे होतील. पहिल्या सत्रात फोकस स्टेटवर चर्चा होतील. यात विजेबाबत सरकारचे धोरण, इंधनाची अडचण तसेच मंजुरी मिळवताना येणा-या अडचणी या बाबींचा समावेश असेल. याच सत्रात खासगी वीजनिर्मिती कंपन्यांसमोर असलेल्या आव्हानांवरही चर्चा होईल.
दुस-या सत्रात ‘एटी अॅण्ड सी’ तोटा कमी करणे, डिस्कॉम रिस्ट्रक्चरिंग स्कीम, ट्रान्समिशन कंजेशन, खासगी कंपन्यांच्या वित्तीय व्यवस्थापनात येत असलेल्या अडचणी तसेच त्याच्याशी संबंधित जोखीम यावर चर्चा होईल. तिस-या सत्रात हायड्रो तसेच अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता, वीजनिर्मिती क्षेत्रात याची वाढती गरज व आव्हाने यावर विस्तृत चर्चा होईल.
कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय विद्युत नियामक आयोग (सीईआरसी), केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सीईए) व ऊर्जा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांसह जिंदल पॉवर, अदानी, सुकॅमसारख्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. सुकॅम, जिंदल पॉवर, बंगाल एमटा, वेदांता आणि पहाडपूर हे कॉन्क्लेव्हचे प्रायोजकही आहेत. एबीपी न्यूज माध्यम प्रायोजक आहेत. कॉन्क्लेव्हमध्ये झालेल्या चर्चेची माहिती सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. दैनिक भास्कर समूहाची पहिली पॉवर कॉन्क्लेव्ह सन 2011 मध्ये झाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.