आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dainik Bhaskar Group In Howard University, News In Marathi

भास्कर समूहाची यशोगाथा थेट हार्वर्डमध्ये; ‘अस्पायरिंग ग्रोथ’मध्ये समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह दैनिक भास्करच्या यशाची गणना जगातील सर्वांत यशस्वी बिझनेस मॉडेल्समध्ये झाली. आयआयएम बंगळुरूने समूहाच्या बिझनेस स्ट्रॅटेजी व मार्केटिंगवर खास अभ्यास केला. ‘अस्पायरिंग ग्रोथ’ हा अभ्यास हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगने मार्केटिंग कम्युनिकेशन वर्गवारीत समाविष्ट केला असून अभ्यासhttp://cb.hbsp.harvard.edu या वेबसाइटवरही टाकला आहे.

हार्वर्ड बिझनेस स्कूलसोबतच आता कॅलिफोर्निया मॅनेजमेंट रिव्ह्यू, युरोपियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, जॉन एफ. केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस व युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगसारख्या जगभरातील टॉप बिझनेस मॅनेजमेंट संस्थांचे विद्यार्थी भास्करचे बिझनेस मॉडेल केस स्टडी म्हणून वाचू शकतील. आयआयएमच्या असिस्टंट प्रोफेसर सीमा गुप्तांचा हा अभ्यास ऑनलाइन व प्रिंट स्वरूपात उपलब्ध आहे.
मीडिया संस्थांच्या अभ्यासात मदत : भास्कर समूहाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना मीडिया संस्थांचे बिझनेस मॉडेल समजावून सांगता येईल. मीडिया इंडस्ट्रीच्या यशस्वी घटकांचे विश्लेषणही करता येईल. टेलिव्हिजन, प्रिंट व इंटरनेट जीवनमानावर कसे प्रभाव टाकतात हे जाणून घेता येईल. सामाजिक, राजकीय व आर्थिक वैविध्याचा पत्रकारितेवर काय परिणाम होतो हेदेखील अभ्यासणे यातून सोपे जाईल, असे हार्वर्डने म्हटले आहे.

हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग आहे काय?
हार्वर्ड विद्यापीठ व हार्वर्ड बिझनेस स्कूलशी संबंधित संस्थांपैकी हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग (एचबीपी) एक आहे. बदलत्या व्यवस्थापन प्रक्रियेला बळकट करण्याच्या उद्देशाने 1994 मध्ये एचबीपीची स्थापना झाली. बोस्टन, न्यूयॉर्क, लंडन व भारतातील आपल्या कार्यालयांच्या माध्यमातून ही संस्था शैक्षणिक व व्यापारी क्षेत्रांमध्ये सेतूचे काम करते. विविध प्रकाशने व इतर माध्यमातून ही संस्था जगातील दर्जेदार बिझनेस स्कूल, संस्था व विद्यापीठांना पुस्तके, केस स्टडी व संशोधन साहित्य उपलब्ध करून देते. चांगले नेतृत्व विकसित होण्याच्या दृष्टीने व व्यवसायातील उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार सामग्री उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश आहे. कॉर्पोरेट शिक्षणाच्या माध्यमातून ही संस्था जगातील सरकारे व कॉर्पोरेट क्षेत्रांत सक्रिय व्यवस्थापकांना जागतिक दर्जाचे डेव्हलपमेंट सोल्युशन उपलब्ध करून देते. हार्वर्ड बिझनेस स्कूल व हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या लेखकांच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांत एचबीपी या क्षेत्रांत आघाडीवर आहे.

जगातील यशस्वी बिझनेस मॉडेल्समध्ये समावेश
दैनिक भास्कर ग्रुप : ‘अस्पायरिंग ग्रोथ’
केस स्टडी म्हणून हार्वर्डमध्ये समाविष्ट अस्पायरिंग ग्रोथमध्ये दैनिक भास्करच्या देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह ठरण्याची यशोगाथा तपशीलवार कथन करण्यात आली आहे. आयआयएम बंगळुरूच्या प्रा. सीमा गुप्ता यांनी लिहिले आहे की, समूहाने आपली जबरदस्त बिझनेस स्ट्रॅटेजी व मार्केटिंगद्वारे बाजारातील नियमच बदलून टाकले. खासकरून हिंदी भाषक राज्यांपासून गुजरात व महाराष्ट्रासारख्या बिगर हिंदीभाषक राज्यांत जाऊन यशस्वी होणे अत्यंत जिकिरीचे होते. कारण वृत्तपत्रांच्या वाचकांची सवय बदलणे अवघड असते. परंतु भास्करने अशी स्ट्रॅटेजी अवलंबली की प्रत्येक वाचकाच्या आयुष्याचा ते भागच बनून गेले. एवढेच नव्हे, लोकांमध्ये या वृत्तपत्राविषयी आत्मीयता निर्माण झाली. समूहाने विस्तारासाठी टायर 2 व 3 ची शहरे निवडली. भविष्यात आर्थिक विकासाची ती वाहक मानली जात आहेत. या अभ्यासात 1958 मध्ये भोपाळमध्ये सुरू झालेल्या भास्करच्या पहिल्या आवृत्तीपासून मध्य प्रदेशात त्याचा झालेला विस्तार व 1988 नंतर छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल, चंदिगड तसेच जम्मू, तसेच पहिल्या दिवसापासून ‘नंबर वन’ असलेल्या गुजरातमधील ‘दिव्य भास्कर’ व महाराष्ट्रीातील ‘दिव्य मराठी’च्या यशातील बिझनेस स्ट्रॅटेजी व मार्केटिंगबद्दल विवेचन आहे. लाखो वाचकांशी थेट संपर्क साधणार्‍या इनोव्हेटिव्ह लाँच स्ट्रॅटेजीचा उल्लेख यात असून या स्ट्रॅटेजीत मार्केटमध्ये दाखल होण्यापूर्वीच वाचक मागणी नोंदवतात.