नवी दिल्ली - दैनिक भास्कर समूहाकडून सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू) दिल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या 'इंडिया प्राइड अवाॅर्ड'चा वितरण सोहळा ४ जूनला दिल्लीत होईल. अर्थमंत्री अरुण जेटली प्रमुख पाहुणे असतील. देशातील प्रसिद्ध अधिकारी वर्ग व सीईओंचीही उपस्थिती असेल. सोहळ्यात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पीएसयूंचा समावेश असतो. समूहाने ५० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून २००९ मध्ये पुरस्कारांची सुरुवात केली होती. डॉ. कुश वर्मा, आयुक्त राष्ट्रीय राजधानी विभागाच्या अध्यक्षतेखाली ज्युरींनी विजेते निवडले आहेत. यंदा सुमारे १५ श्रेणीत पुरस्कार दिले जातील. त्याचे मूल्यांकन प्रख्यात रेटिंग संस्था आयसीआरए लि. करते. ग्राहक जगत, वित्तसेवा, ऊर्जा, अवजड उद्योग, तेल, वायू व पर्यावरणासह विविध क्षेत्रांतील पीएसयूंचा यंदा समावेश आहे.