आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली/नोएडा- dainikbhaskar.com वर आम्हाला वुमन प्राइड अवॉर्ड स्पर्धेत देशभरातील महिलांच्या जीवनातील संघर्ष दर्शवणार्या आणि प्रेरणादायी ठरणार्या शेकडो कथा प्राप्त झाल्या. स्पर्धेच्या ज्युरी माधुरी दीक्षित, शोभा डे आणि मेरी कोम यांनी यातून तीन विजेत्या महिला निवडल्या. यात मध्य प्रदेशातील जावरा येथील बबली गंभीर यांनी अव्वल स्थान पटकावले. रतलामच्या डॉ. लीला जोशी यांनी दुसरे तर राजस्थानमधील झालावाडच्या मंजू धाकड यांनी तिसरे स्थान पटकावले. या सर्वांना ज्युरींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या तिन्ही महिलांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत यशाची शिखरे गाठली आहेत. शिवाय समाजाला नवी दिशा दिली आहे. बबली गंभीर यांनी आपल्या दोन्ही हाताची मिळून पाचच बोटे असताना जीवनात कसा संघर्ष करावा लागला, याचे वर्णन केले आहे. या परिस्थितीतही त्यांनी जिद्द सोडली नाही.आज त्यांचे आधुनिक ब्युटी पार्लर आहे. त्यांच्या दोन्ही हाताच्या मिळून पाच बोटांची कलाकुसरच कित्येकांना सौंदर्य प्रदान करत आहे.
डॉ. लीला जोशी यांची बहीण गायत्री तिवारी यांनी डॉक्टर बहिणीची कथा सांगितली आहे. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अॅनिमियाने ग्रस्त महिलांना डॉ. जोशी यांनी कशी मदत केली. त्यांना अपत्य झाले तर अर्भकाला सुदृढ आरोग्य मिळावे म्हणून डॉ. जोशी यांनी कसे कष्ट घेतले, याचे वर्णन कथेत आहे. आजही त्या या कामात व्यग्र असतात.
राजस्थानच्या झालावाड येथील मंजू धाकड यांच्याबद्दल त्यांचे पती हरिश खलोरा यांनी उपेक्षित मुलींना शिक्षण मिळावे म्हणून आपली पत्नी रोज सुमारे 40 किलोमीटर प्रवास कशी करते, हे खलोरा यांनी सांगितले आहे. मंजू यांना स्वत:लाही शिक्षणात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. वडिलांच्या विरोधामुळे उच्चशिक्षणासाठी त्या बाहेरगावी जाऊ शकल्या नाहीत. जिद्दीने त्यांनी बीएससी केले. आज ज्या मुली काही ना काही कारणांमुळे शिकू शकत नाहीत, अशांना मंजू धाकड मदत करतात. तिन्ही विजेत्या महिलांनाच्याdainikbhaskar.comवतीने हार्दिक शुभेच्छा. या महिलांच्या संघर्षाच्या कथा वाचण्यासाठीdainikbhaskar.com वर लॉग ऑन करा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.