आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dainik Bhaskar's Upmita Vajpeyi Awarded Stree Shakti National Award

‘दैनिक भास्कर’च्या उपमिता वाजपेयी यांना ‘स्त्री शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘दैनिक भास्कर’च्या विशेष प्रतिनिधी उपमिता वाजपेयी यांना शनिवारी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘स्त्री शक्ती’पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त आयोजित एका शानदार समारंभात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध श्रेणींत एकूण 16 पत्रकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला.
महिलांवरील अ‍ॅसिड हल्ले आणि अ‍ॅसिडच्या खुलेआम विक्रीविरोधात उपमिता यांनी आपल्या लेखणीद्वारे जोरदार मोहीम छेडली होती. अ‍ॅसिड हल्ल्यास बळी पडूनही संघर्ष करणा-या महिलांच्या अन्यायासही त्यांनी वाचा फोडली होती. पत्रकारितेतील या योगदानाबद्दल भारतीय प्रेस परिषदने त्यांचीयंदाच्या स्री शक्ती पुरस्कारासाठी निवड केली. याशिवाय इंडिया टुडेचे संतोषकुमार, मल्याळम मनोरमाचे के.सी.के.विनंदन यांना शोध पत्रकारितेसाठी राजा राममोहन राय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर इंडियन एक्स्प्रेसच्या मनू पब्बी यांना रचनात्मक श्रेष्ठतेसाठी पुरस्कार देण्यात आला. तहलकाचे श्रीश खरे, द इंडियन एक्स्प्रेसचे के.संतोष सिंह, मल्याळम मनोरमाचे सेबिन एस.कोट्टाराम, टाइम्स ऑफ इंडियाचे सुदीप्तो दास यांचाही पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये समावेश आहे.