आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार ठरवणार डाळी-साखर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, महागाईवर नियंत्रण ठेवणे सोपे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या वतीने मापन पद्धत नियमात (मेट्रोलॉजी रुल्स) बदल करण्यात आला आहे. यामुळे सरकारला असाधारण परिस्थितीत डाळी आणि साखरेसारख्या अत्यावश्यक वस्तूंचे किरकोळ बाजारातील दर निश्चित करता येणार आहेत. सध्याच्या व्यवस्थेत किरकोळ बाजारातील किमती बाजारातील सामर्थ्यशाली व्यक्ती निश्चित करतात. त्यामुळे अचानक एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे सरकारला अवघड जात हाेते. त्यामुळेच सरकारच्या वतीने वैधमापन पद्धत (पॅकेट बंद जिन्स) नियम, २०११ मध्ये दुरुस्ती अधिसूचित करण्यात आले असल्याचे ग्राहक व्यवहार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये आवश्यक वस्तूंची किरकोळ किंमत ठरवण्याच्या अधिकाराचा समावेश करण्यात आला आहे. ज्या वस्तू खुल्या किंवा पॅकेटबंद करून किरकोळ बाजारात विक्री केल्या जातात त्या सर्व वस्तूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्य परिस्थितीत किमती निश्चित करण्यात येणार नसून असामान्य परिस्थिती असल्यानंतरच किरकोळ बाजारातील किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला अाहे.

भारतात घाऊक व्यापारी आणि आयातदार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम होते. मात्र, किरकोळ बाजारातील विक्रीवर कारवाई करण्यासाठी नियम नव्हते. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचा विचार करून सरकारच्या वतीने हा बदल करण्यात आला आहे. यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...